Vastu Tips: पैसा आकर्षित करणारं झाड! घरात या बाजूला ठेवल्यास जबरदस्त परिणाम दाखवतं

Last Updated:

Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रामध्ये झाडे आणि वनस्पतींना सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. योग्य दिशेला शुभ झाडे लावल्यास त्याचे अनेक फायदे होतात. झाडे घरात ऊर्जा आणतात. तुळस, बांबू किंवा मनी प्लांटसारखी शुभ मानली जाणारी झाडे घरात आनंद, सौभाग्य आणि संपत्ती आकर्षित करतात, असे मानले जातात.

News18
News18
मुंबई : वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आहे. या शास्त्राचा उद्देश केवळ घर बांधणे किंवा त्याची रचना करणे इतकाच नसून मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्धी आणणे हा आहे. वास्तुशास्त्राचा मूळ अर्थ राहण्याचे शास्त्र असा आहे. हे शास्त्र निसर्गातील पाच मूलभूत घटक (पंचमहाभूत) - पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश आणि दिशा यांच्यात संतुलन राखण्याचे कार्य करते.
वास्तुशास्त्रामध्ये झाडे आणि वनस्पतींना सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. योग्य दिशेला शुभ झाडे लावल्यास त्याचे अनेक फायदे होतात. झाडे घरात ऊर्जा आणतात. तुळस, बांबू किंवा मनी प्लांटसारखी शुभ मानली जाणारी झाडे घरात आनंद, सौभाग्य आणि संपत्ती आकर्षित करतात, असे मानले जातात. आज आपण मनी प्लांटविषयी सविस्तर जाणून घेऊ.
मनी प्लांटला संपत्ती आणि समृद्धीचे रोप मानले जाते. असे म्हटले जाते की योग्य दिशेने लावल्यास ते आर्थिक प्रगती, गोड नातेसंबंध आणि आनंद आणते. तथापि, चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
advertisement
मनी प्लांटची योग्य दिशा - मनी प्लांट घरात लावण्यापूर्वी त्याची योग्य दिशा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे रोप कधीही ईशान्य दिशेला लावू नये. असं केल्यानं घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील लोकांच्या उत्पन्नावर आणि बचतीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
घरात समृद्धी आणि लाभ हवा असेल तर मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावा. ही दिशा धन आणि सौभाग्य वाढवणारी मानली जाते आणि येथे मनी प्लांट लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
मनी प्लांटशी संबंधित या चुका टाळा - तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर मनी प्लांट नेहमी हिरवा आणि फ्रेश राखा. कोरडं पडलेलं पिवळसर रोप नकारात्मक परिणाम करू शकतं. शिवाय, मनी प्लांट घराबाहेर किंवा दारात कधीही लावू नका. काचेच्या बाटलीत किंवा हिरव्या भांड्यात हे रोप लावल्यानं त्याचे शुभ परिणाम वाढतात. मनी प्लांट कधीही शौचालय किंवा बाथरूमजवळ ठेवू नका, कारण यामुळे त्याचे शुभ परिणाम कमी होतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: पैसा आकर्षित करणारं झाड! घरात या बाजूला ठेवल्यास जबरदस्त परिणाम दाखवतं
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement