HMIS: एका क्लिकवर मिळणार बेड आणि अ‍ॅम्बुलन्स! कूपर रुग्णालयात एचएमआयएसचा प्रयोग सुरू

Last Updated:

HMIS: कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

HMIS: एका क्लिकवर मिळणार बेड आणि अॅम्बुलन्स! कूपर रुग्णालयात एचएमआयएसचा प्रयोग सुरू
HMIS: एका क्लिकवर मिळणार बेड आणि अॅम्बुलन्स! कूपर रुग्णालयात एचएमआयएसचा प्रयोग सुरू
मुंबई: महानगरी मुंबईतील सरकारी दवाखाना असो किंवा इतर कोणताही सरकारी दवाखाना असो, तेथील व्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. कारण, या दवाखान्यांमधील व्यवस्थापनात नेहमीच सावळा गोंधळ असतो, असं नागरिकांचं मत आहे. मुंबईतील पालिका रुग्णालयांनी मात्र, आपली ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता लवकरच महापालिका रुग्णालयांतील विविध स्वरुपाची माहिती नागरिकांना पालिकेच्या पोर्टलवर आणि चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा (एचएमआयएस) प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महापालिकेच्या कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष किती वाजेपर्यंत सुरू असतो, रुग्णवाहिका किती वेळात उपलब्ध होईल, अशी विविध स्वरुपाची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे.
advertisement
गेल्या काही दिवासांपासून कूपर रुग्णालय सातत्याने चर्चेत आहे. तिथे रुग्णांना उंदीर चावल्याचं प्रकरण घडलं होतं. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय मोहिते यांनी गुरुवारी (25 सप्टेंबर) संवादसत्राचं आयोजन केलं होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमधील विविध मुद्दे तसेच अन्य रुग्णालयांतील सेवा सुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, झीरो प्रिस्क्रिप्शन योजना, भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
advertisement
रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये रुग्णांसंबंधित डेटा गोळा करणे, त्याचं विश्लेषण करणे आणि प्रशासकीय कामांना सुलभ करण्यासाठी एचएमआयएस प्रणालीचा उपयोग होतो. ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे. जी रुग्णांच्या उपचारांची प्रक्रिया सुधारते आणि रुग्णालयांना आवश्यक डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत करते. पालिकेच्या अन्य चार रुग्णालयांप्रमाणे 'केईएम'मध्येही प्रायोगिक तत्त्वावर 'एचएमआयएस' प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान, कूपर रुग्णालयात येत्या तीन महिन्यांत किमोथेरपी सेंटर सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. नायर कॅन्सर रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीच्या 6 मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झालं आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HMIS: एका क्लिकवर मिळणार बेड आणि अ‍ॅम्बुलन्स! कूपर रुग्णालयात एचएमआयएसचा प्रयोग सुरू
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement