Badlapur Traffic: बदलापूरकरांची वाहतूककोंडीतून सुटका, मेगाप्लॅन समोर, भूमीपूजनही झालं!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Badlapur Traffic: बदलापूरकरांची लवकरच वाहतूकोंडीतून सुटका होणार आहे. आता न्यू पनवेल हायवेवरून कात्रप ते खरवई जुवेलीपर्यंत रिंग रोड होणार आहे.
बदलापूर: बदलापूर पूर्वेकडील कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे. कात्रप, शिरगांव ते जुवेली – खरवई रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतेच आमदार किसन कथोरे यांनी या रस्ता कामाचे भूमीपूजन केले. त्यामुळे बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार असून वेळ वाचणार आहे.
कर्जत-कल्याणला जोडणारा राज्य महामार्ग बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगांव भागातून जातो. कात्रप परिसरात बाजारपेठ असल्यामुळे वाहनांची वर्दळ नेहमी असते. मात्र, आता न्यू पनवेल हायवेवरून कात्रप ते खरवई जुवेलीपर्यंत बाह्यवळण रस्ता (रिंग रोड) होणार आहे. त्यामुळे बरीच वाहतूक आता शहराच्या बाहेरून होईल. त्यामुळे कात्रप रस्त्यावरचा ताण कमी होणार असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांची देखील वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
advertisement
आमदार किस कथोरे हे या रस्त्याला एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूर येथे आले असता त्यांनी शहरातील विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी 90 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. तसेच या रिंगरोडमुळे महामार्गालगतच्या परिसरातील विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, नव्याने होत असलेला रिंग रोड 120 फूट रुंदीचा असणार आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. तसेच रिंग रोडशी जोडल्या जाणाऱ्या शिरगांव, जुवेली, मानकिवली, खरवई परिसरातील विकासाला देखील गती मिळणार आहे.
Location :
Badlapur,Thane,Maharashtra
First Published :
September 26, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Badlapur Traffic: बदलापूरकरांची वाहतूककोंडीतून सुटका, मेगाप्लॅन समोर, भूमीपूजनही झालं!