Beed Crime : वाढदिवसाच्या पार्टीचा वाद अन् पत्रकाराच्या मुलावर सपासप वार! यशसोबत रात्री 8:30 वाजता काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Crime News : रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठी यश याने सुरजला माने कॉम्प्लेक्स परिसरात बोलावले होते. सुरज हा आपल्या भावाला तर यश हा मित्रांना घेऊन आला.
Beed Crime News : बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. अनेक मोठ्या हत्यांकाडानंतर आता तरुण मुलं देखील गुन्हेगारीच्या विळख्यात अडकच चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच बीडमध्ये एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रा मित्रांमध्ये झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या छातीत चाकू खूपसून हत्या केल्याची घटना घडली आहे. यश देवेंद्र ढाका असं मयत तरुणाचं नाव आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात ही घटना घडली.
देशपांडे हॉस्पिटलसमोर पुन्हा राडा
यश ढाका आणि सुरज काटे यांच्यात गुरूवारी दुपारी अंबिका चौक परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठी यश याने सुरजला माने कॉम्प्लेक्स परिसरात बोलावले होते. सुरज हा आपल्या भावाला तर यश हा मित्रांना घेऊन आला होता. देशपांडे हॉस्पिटलसमोर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
advertisement
पोटात चाकूचे तीन ते चार वार
यश आणि त्याचे सहकारी यांनी सुरज याला मारहाण केली तर सुरजने देखील यशला मारहाण केली. या भांडणात सुरजने यश याच्या पोटात चाकूने तीन ते चार वार केले. यामुळे यश याचा जागीच मृत्यू झाला. मृत यश ढाका आणि सूरज काटे हे दोघे चांगले मित्र होते. महिन्याभरापुर्वीच या दोघांची एका बर्थडे पार्टीत वाद झाला होता. या वादानंतर दोघांमध्ये कटूता आली होती. तसेच एकमेकांविरूद्ध सुडाची भावना निर्माण झाली होती.
advertisement
छातीत झालेले दोन वार आरपार
दरम्यान, शिवाजीननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार व सहकाऱ्यांनी धाव घेतली. अवघ्या एका तासात सुरज काटे या आरोपीला ताब्यात घेतलं. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंगचे) शिक्षण घेत होता.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
September 26, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : वाढदिवसाच्या पार्टीचा वाद अन् पत्रकाराच्या मुलावर सपासप वार! यशसोबत रात्री 8:30 वाजता काय घडलं?