advertisement

Kitchen Hacks : 'या' ट्रिकने तपासा किती शिल्लक आहे गॅस; सिलेंडर संपल्यावर ऐनवेळी होणारी धावाधाव टळेल!

Last Updated:

how to check gas in cylinder : एका महिन्यातच संपेल किंवा 2 महिन्यात संपेल असे ठरलेले नसते. म्हणून आपल्याला गॅस किती शिल्लक आहे हे तपासता येणं सोयीचं असतं. आज आम्ही तुम्हाला यासाठीच एक भन्नाट ट्रिक सांगत आहोत.

सिलेंडरमधील गॅस तपासण्याच्या पद्धती
सिलेंडरमधील गॅस तपासण्याच्या पद्धती
मुंबई : घरी पाहुणे आले असतील किंवा एखादा सण असेल आणि नेमका त्याचवेळाल गॅस सिलेंडर संपला तर..? अशी परिस्थिती खूप वाईट असते. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याला घरात एक तर जास्तीचा सिलेंडर असावा नाहीतर आपल्याला माहित असावे की गॅस कधी संपणार आहे. मात्र गॅस किती शिल्लक आहे, सांगणं तसं अवघड असतं . कारण त्याचा वापर एकसारखा नसतो.
एका महिन्यातच संपेल किंवा 2 महिन्यात संपेल असे ठरलेले नसते. म्हणून आपल्याला गॅस किती शिल्लक आहे हे तपासता येणं सोयीचं असतं. आज आम्ही तुम्हाला यासाठीच एक भन्नाट ट्रिक सांगत आहोत. ही ट्रिक salve_6717 या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया सविस्तर माहिती.
असे तपासा सिलेंडरमध्ये किती गॅस आहे शिल्लक..
एक कापड पाण्यात भिजवा. ते पिळा आणि त्या ओल्या कापडाने सिलेंडर पूर्णपणे पुसा. त्यानंतर 2 मिनिटे थांबा. सिलेंडरच्या वरचा जेवढा भाग सुकेल तितका तुमचा गॅस खर्च झालेला आहे. 2 मिनिटांनंतरही पाणी सुकले नाही तर गॅस शिल्लक आहे. ही युक्ती यामुळे काम करते, कारण जिथे गॅस शिल्लक आहे ती जागा थंड असल्याने ओली दिसेल. याउलट रिकामी जागा उबदार असल्याने ती लवकर सुकेल.
advertisement
सिलेंडरमधील गॅस तपासण्याच्या इतर पद्धती
- गॅस तपासण्यासाठी सिलेंडरवर थोडेसे पाणी टाकून पाहा. सिलेंडरचा जितका भाग जास्त वेळ थंड असले तितका गॅस शिल्लक आहे.
- सिलेंडर उचलूनदेखील तुम्ही किती गॅस शिल्लक आहे, हे तपासू शकता. सिलेंडरचे एकूण वजन आणि रिकामे वजन सिलेंडरवर लिहिलेले असते. एकूण वजनातून रिकामे वजन वजा केल्याने किती गॅस शिल्लक आहे कळू शकते.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Ashish Salve (@salve_6717)



advertisement
- बाजारातून मॅग्नेटिक गॅस लेव्हल इंडिकेटर खरेदी करा. ते सिलेंडरच्या बाहेरील बाजूस जोडा. यामुळे तुम्हाला गॅस लेव्हल किती आहे हे कळू शकते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : 'या' ट्रिकने तपासा किती शिल्लक आहे गॅस; सिलेंडर संपल्यावर ऐनवेळी होणारी धावाधाव टळेल!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement