माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pitya Bhai Ramesh Pardeshi : पिट्या भाई म्हणजे अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील टेकडीवर त्यांच्यासोबत घडलेल्या एका भयंकर प्रकाराबाबत सोशल मीडियावर सांगितलं आहे.
advertisement
रमेश परदेशी म्हणाले, नेहमीप्रमाणे ARAI टेकडीवर पळायला गेलो होतो. घरी आल्यावर आंघोळ करताना लक्षात आलं आपल्याला मघाशी किरकोळ चावलंय अस वाटलेलं ते जास्त दुखतंय. म्हणून सरकारी दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितलं टोटल 5 इंजेक्शन घ्यावी लागतील काही तरी टाइप 3 आहे म्हणून. आता 2 घेतली अजून 7 दिवसाच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत. हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावलं असतं तर केवढ्याला पडले असतं?
advertisement
रमेश परदेशी यांना टेकडीवर कुत्रा चावला. मांडीला एका कुत्र्याने चावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, टेकडीवर पळत असताना एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री खात होती. तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसंच पुढे गेलो तर माझ्यासारखाच एक प्राणी प्रेमी मित्र 10 ते 12 कुत्र्यांना खायला देत होता. मी पण कधी कधी सीटीमध्ये उपाशी कुत्र्यांना पाव, बिस्किट देत असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







