Chandra Grahan 2026: काहीच वेळात ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण! पुढचे 90 दिवस तूळसह 5 राशींना जॅकपॉट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chandra Grahan 2026 Lucky Rashifal: 2026 सालातील पहिल्या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने याचा सूतक काळ पाळला जात आहे. यंदाचे चंद्रग्रहण सूर्याच्या सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. विशेष म्हणजे, कुंभ राशीत राहू, मंगळ, बुध आणि सूर्य यांची युती होत असून मीन राशीत शनि आणि शुक्र एकत्र आहेत. यामुळे मालव्य आणि बुधादित्य यांसारखे शुभ राजयोग तयार होत आहेत.
advertisement
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ ठरेल. शनिच्या साडेसातीचा प्रभाव या काळात कमी झालेला जाणवेल. तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगले बदल घडतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमचे नियोजन यशस्वी होईल. घर किंवा फ्लॅट घेण्याची तुमची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे 90 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे बोलणे आणि संवाद सुधारल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. रखडलेले निर्णय तुम्ही वेगाने घेऊ शकाल. एखादे मोठे काम सुरू करण्यासाठी तुम्ही योग्य संधीची वाट पाहत असाल, तर ती संधी आता तुम्हाला मिळेल. अडकलेली कामे सहज पूर्ण होतील.
advertisement
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण मनासारखी फळे देणारे ठरेल. तुम्ही ठरवलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक सहलीला जाण्याचे योग आहेत. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि बड्या लोकांशी ओळखी होतील. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांच्या दृष्टीने हा काळ स्पष्टता आणणारा असेल. तुमच्या आयुष्यात कोणती माणसे महत्त्वाची आहेत, हे तुम्हाला उमजेल. जर तुम्ही सातत्याने कष्ट करत असाल, तर तुमच्या सर्जनशील कामाला आणि कलेला सार्वजनिक ओळख मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना येत्या 90 दिवसांत चांगला आर्थिक नफा होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण अतिशय उत्तम ठरणार आहे. सध्या तुमच्या राशीवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पुढच्या 90 दिवसांत तुम्हाला असे जाणवेल की, ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा हळूहळू पुढे सरकत आहेत. करिअरशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना योग्य दिशा मिळेल. मनातील गोंधळ संपून कामात स्पष्टता येईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






