advertisement

Nashik News: नाशिकमध्ये ३ महिने बस धावणारच नाही, प्रकरण नेमकं काय? ही बातमी आवश्य वाचा...

Last Updated:

नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतूक पोलि‍सांनी बसेसला 'नो एन्ट्री' दिलेली आहे. पण आता वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातल्या प्रवेशबंदीमध्ये वाढ केलेली आहे.

News18
News18
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. रस्ते दुरूस्ती, रस्त्याचे रूंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सध्या सुरू आहेत. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतूक पोलिसांनी खासगी बसेस आणि अवजड वाहनांना 'नो एन्ट्री' दिलेली आहे. यामुळे आता नाशिककरांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी नाशिकमध्ये पुढच्या तीन महिन्यांसाठी खासगी बसेस आणि अवजड वाहनांना नो एन्ट्री केलेली आहे. काही ठराविक वेळेसाठी नाशिकमध्ये नो एन्ट्री असणाक आहे. कोणकोणत्या वेळेसाठी नो एन्ट्री असणार आहे, जाणून घेऊया...
बसेसला नाशिकमध्ये नो एन्ट्री
वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी नाशिक शहरातील सर्व खासगी बसेसचे बसस्टॉप्स, त्यांचे पिकअप- ड्रॉप सेंटर आणि सर्व पार्किंग सुद्धा रद्द करण्यात आली आहेत. प्रायव्हेट बसेसलाच नाशिकमध्ये 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे. परंतू, नाशिक जिल्ह्यामध्ये सेवा पुरवणाऱ्या सिटी लिंक बसेसला कोणतेही निर्बंध नाहीत. तपोवनमध्ये असलेल्या सिटीलिंक बस टर्मिनलवरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना नाशिकमध्ये प्रवास करणं सोयीचं होईल. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातील प्रवेश बंदीमध्ये वाढ केलेली आहे. 31 मे 2026 पर्यंत या अधिसूचनेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे.
advertisement
शहरातल्या प्रवेशबंदीमध्ये वाढ
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त द्वारका सिग्नल- सारडा सर्कल- काठे गल्लीपर्यंत 'ग्रेड सेप्रेटर'चे काम सुरू असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. यामुळे वाहतूकदारांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. चार चाकी वाहनांना आणि दुचाकी वाहनांना मुंबई नाका आणि टाकळीच्या मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जानेवारी 2026 पासून सर्व खासगी बसेसचे बसस्टॉप रद्द करण्याबाबत आणि शहरात प्रवेशबंदी लागू करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. आता त्यात वाढ करून 31 मे 2026 पर्यंत ही अधिसूचना लागू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासकामांमुळे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी नाशिककरांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
सध्या शहरातील 29 रस्त्यांचे आणि 5 उड्डाणपुलाचे दुरुस्ती आणि खोदकामाचे काम सुरू आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांना वाहतूक विभागाने लादलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिकमध्ये ३ महिने बस धावणारच नाही, प्रकरण नेमकं काय? ही बातमी आवश्य वाचा...
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement