6 वाजून 48 मिनिटांनी संपणार चंद्रग्रहण, ग्रहण संपताच न चुकता लगेचच करा 'ही' 6 काम!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी आजच्या चंद्रग्रहणाचा 'मोक्ष काळ' म्हणजेच समाप्ती होत आहे. शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता दूर करण्यासाठी ग्रहण सुटल्यानंतरची वेळ अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
शुद्धीकरण: ग्रहण संपताच सर्वात पहिले काम म्हणजे संपूर्ण स्नान करणे. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा मीठ टाकावे. यामुळे ग्रहणादरम्यान शरीरावर पडलेला नकारात्मक प्रभाव आणि सूतक दोष दूर होतो. धुलिवंदन असल्याने अनेकांनी रंगाने खेळले असेल, तरीही ग्रहणानंतरचे हे 'शुद्धीकरण स्नान' अनिवार्य मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंगळ दर्शन आणि आरती: ग्रहण सुटल्यानंतर देवासमोर दिवा लावावा आणि कुलदेवतेची आरती करावी. ग्रहण काळात आपण जो जप केला, त्याचे अर्पण देवाला करावे. यामुळे ग्रहणाच्या काळ सावटातून मुक्त होऊन घरामध्ये पुन्हा मंगलमय वातावरण निर्माण होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







