Weather Alert: वारं फिरलं, टेन्शन वाढलं! पुणे, सोलापुरात धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: बंगालच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 48 तासांसाठी पुणे, सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरू आहे. आज 26 सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यामुळे कमाल तापमान तिशीपार जाऊन 30.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.

3/7
गुरुवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस इतके राहिले. आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस राहिले. आज तापमानात काहीशी घट होणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
सोलापूर परिसरात मागील 24 तासात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र पूरस्थिती गंभीर आहे. करमाळा, परांडा, बार्शी, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर या सर्व तालूक्यात पूराचा भयंकर फटका बसला आहे. अशातच आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

6/7
सांगली शहर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने शेतीला दिलासा मिळत आहे. परंतु आज शुक्रवारपासून सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

7/7
दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना 26 सप्टेंबर रोजी विजांसह मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर राहणार असून घाटभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement