Kalyan Dombivli Traffic : कल्याण- डोंबिवलीतल्या खड्ड्यांना नागरिकच नाही तर वाहतूक पोलिसही त्रस्त, रस्ता दुरूस्तीचा मुहूर्त केव्हाचा ?

Last Updated:

Kalyan Dombivli Traffic : वाहतूक कोंडीचा संपूर्ण कल्याण शहराला आणि आजूबाजूच्या शहरांनाही याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. या ट्रॅफिकचा त्रास फक्त सामान्य नागरिकांनाच होत नाही, तर पोलिसांनाही होत असल्याचे सांगितले आहे. शिवाय खड्ड्याचा त्रासही त्यांना होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

News18
News18
वाहतूक कोंडीमुळे कायमच कल्याण- डोंबिवली शहर चर्चेमध्ये राहते. केव्हाही कल्याण- डोंबिवलीत गेलं तरीही प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कल्याण पश्चिमेतून उल्हासनगर, वालधूनी, विठ्ठलवाडी आणि कल्याण पूर्वेकडे जाणारा वालधूनी पूलावर कायमच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीचा संपूर्ण कल्याण शहराला आणि आजूबाजूच्या शहरांनाही याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. या ट्रॅफिकचा त्रास फक्त सामान्य नागरिकांनाच होत नाही, तर पोलिसांनाही होत असल्याचे सांगितले आहे. शिवाय खड्ड्याचा त्रासही त्यांना होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांना जोडणारा वालधूनी पूल आणि परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सर्वांनाच होत असल्याचा आता हे स्पष्ट झाले आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी वाहतूक शाखेचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. वाहतूक समस्या त्वरीत दूर करण्याची मागणी एनसीपीच्या पदाधिकार्‍यांनी पोलि‍सांकडे केली. ही वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याने यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असे एसीपी बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे. या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचाही त्रास वाहतूक पोलीसांनाही होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
advertisement
कल्याण शहरामधील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या वालधूनी पूल परिसरात कायमच ट्रॅफिक पाहायला मिळते. कल्याण स्थानकाकडे, रामबाग, सिंडिकेट, कल्याण पूर्व, बिर्ला कॉलेज या ठिकाणी जाण्यासाठी दररोज वालधूनी पूल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्याचा त्रास प्रवासी, वाहन चालकांसह नागरिकांना होतो. या प्रकरणी शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत वाहतूक कोंडीवर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली. वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, नोकरवर्ग, रुग्णवाहिका आणि सामान्य माणसांना फटका बसत आहे. काही मिनिटांच्या प्रवासाला तासनतास लागत आहे.
advertisement
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना आंदोलनाचाच थेट इशारा दिला आहे. जर, लवकरात लवकर वाहतूक कोंडीवर तोडगा काढला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे. वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे होत असल्याचे एसीपी बालवडकर यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. शिवाय यासंदर्भात केडीएमसीला पत्र व्यवहार केला आहे. खड्डे बुजले की, वाहतूक समस्या संपेल असं ही ते म्हणाले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही वाहतूक कोंडीसाठी रस्त्यावरील खड्ड्यांनाच जबाबदार ठरवले. त्यामुळे आत्ता महापालिका रस्त्यावरील खड्डे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
गणेशोत्सवापासून रस्त्यावरील खड्डे भरले जाणार असल्याची माहिती केडीएमसी देतेय. पण अद्यापही ते काम झालेलं नाही. गणेशोत्सव झाला, आता नवरात्रोत्सव सुरू आहे, काही दिवसांत दसरा येईल. पण अद्यापही रस्त्यावरील खड्डे बुजलेले नाहीत. आणखी किती दिवस कल्याण- डोंबिवलीकरांना खड्ड्यातून प्रवासांना करावा लागणार ? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. केडीएमसी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणखी कोणत्या सणाची वाट पाहते ? असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivli Traffic : कल्याण- डोंबिवलीतल्या खड्ड्यांना नागरिकच नाही तर वाहतूक पोलिसही त्रस्त, रस्ता दुरूस्तीचा मुहूर्त केव्हाचा ?
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement