आमच्याकडे कशाला आलात? हायकोर्टाचा समीर वानखेडेंना सवाल, आर्यनविरोधातील याचिकेवर काय झालं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
समीर वानखेडे यांनी 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून रेड चिलीज, आर्यन खान, शाहरुख खान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या वेब सिरीज 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'शी संबंधित मानहानीच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने समीर वानखेडे यांना त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्यास सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' विरोधात वानखेडे यांच्या याचिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'दिल्लीत खटला का दाखल करण्यात आला', असा प्रश्न न्यायमूर्ती कौर यांनी विचारला.
समीर वानखेडे यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात पासओव्हर मागितला आहे. प्रत्येक खटल्याची सुनावणी झाल्यानंतर सुनावणीची विनंती करण्यासाठी पासओव्हर मागितला जातो. वानखेडे यांच्या वकिलाने प्रकरणात सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला. दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या वकिलाची विनंती स्वीकारली आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, "तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता." दिल्ली उच्च न्यायालयाची रजिस्ट्री आता सुनावणीची पुढील तारीख जाहीर करेल.
advertisement
समीर वानखेडे यांनी वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या हिंसाचार, गैरवर्तन आणि नकारात्मक चित्रणासाठी आर्यन खानविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्यांचा असा दावा आहे की रेड चिलीजच्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरीजमुळे ड्रग्ज विरोधी संस्था आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा मलिन झाली आहे आणि जनतेचा विश्वास उडाला आहे.
advertisement
समीर यांचा दावा आहे की, या मालिकेत काही अश्लील आणि अपमानजनक सीन्स आहेत, विशेषतः एका पात्राने राष्ट्रीय प्रतीक "सत्यमेव जयते" चा अपमान केला आहे, जो माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन करतो.
समीर वानखेडे यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, वेब सिरीजमध्ये त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांच्या याचिकेत त्यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेमोरियल बिल्डिंग आणि इतरांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या मालिकेवर कायमची बंदी घालण्याची आणि 2 कोटी भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी भरपाईची रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आमच्याकडे कशाला आलात? हायकोर्टाचा समीर वानखेडेंना सवाल, आर्यनविरोधातील याचिकेवर काय झालं?