मुंबईच्या एन्काउंटर स्पेशालिस्टवर बायोपिक, 'रेगे'नंतर पानसेंच्या नव्या सिनेमाची घोषणा

Last Updated:

Abhijit Panse Movie : मुंबईतील क्राइम जगतातील एक महत्त्वाचा चेहरा या सिनेमाचा हिरो असणार आहे. अभिजीत पानसेंनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

News18
News18
मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या सिनेमांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असतं. 'रेगे' आणि 'ठाकरे'च्या यशानंतर अभिजीत पानसे यांनी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. मुंबईतील क्राइम जगतातील एक महत्त्वाचा चेहरा या सिनेमाचा हिरो असणार आहे. हा सिनेमा बायोपिक असून त्यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे.
अभिजीत पानसे मुंबई पोलीस दलातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर बायोपिक करणार आहे. प्रदिप शर्मा हे माजी मुंबई पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये ठार केलं. प्रदिप शर्मा यांचं जीवनपट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिजीत पानसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
advertisement
मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ओळखलं जातं. त्यांच्या धडाकेबाज कारकिर्दीमुळे ते गँगवॉर संपवणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले. टाइम्स मॅगझीनमध्ये त्यांचा फोटो देखील झळकला होता.

मुंबई स्वच्छ करण्यातील मोठा वाटा

मुंबई स्वच्छ करण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात प्रदीप शर्मा यांचं नाव घेतलं जातं. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सर्वांना माहिती असलेल्या शर्मा यांचं माणूस म्हणून असलेलं आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आतापर्यंत या बाजूला प्रकाशझोत मिळाला नव्हता. मात्र आता सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा हा पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहे, असं पानसे यांनी सांगितलं.
advertisement

वेगळ्या धाटणीचा चित्रपट

अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे की, आतापर्यंत गँगवॉरवर अनेक चित्रपट आले. पण प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट निश्चितच वेगळा असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. साहेबांना हा विषय आवडला असल्याचंही पानसे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध 

advertisement
प्रदीप शर्मा यांच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असंही पानसे म्हणाले. प्रदीप शर्मा आणि अभिजीत पानसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शीवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.

5 भाषेत होणार रिलीज 

अभिजीत पानसे यांनी सांगितलं की, हा सिनेमा केवळ हिंदी किंवा मराठीतच नव्हे, तर 5 भाषेत लॉन्च होईल. या सिनेमात प्रदीप शर्मा यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबईच्या एन्काउंटर स्पेशालिस्टवर बायोपिक, 'रेगे'नंतर पानसेंच्या नव्या सिनेमाची घोषणा
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement