Pune Crime : 'दहशत कमी होतीये, धाक निर्माण करा', निलेश घायवळनेच रचला होता 'कोथरूड'चा प्लॅन, धक्कादायक माहिती समोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Nilesh Ghaywal Gang : आपल्या टोळीची दहशत कमी होत असल्याने निलेश घायवळ याने टोळीतील सदस्यांना चिथावणी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
Pune Kothrud Crime : कोथरूडच्या गोळीबारात निलेश घायवळ याचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या चार आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर मोठी पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात निलेश घायवळ याच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर निलेश घायवळसह मयूर कुंभरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादळेकर, मुसाब शेख, अक्षय गोगावले आणि जयेश वाघ यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना पिस्तुल निलेश घायवळने दिलं
आपल्या टोळीची दहशत कमी होत असल्याने निलेश घायवळ याने टोळीतील सदस्यांना चिथावणी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. निलेश घायवळ यानेच टोळीतील सदस्यांना फ्री हँड दिला होता, असं समोर आल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचललं आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील संबंधित आरोपींना पिस्तुल निलेश घायवळकडून देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. 'आपली दहशत कमी होत चालली आहे, पैसा मिळत नाही, त्यामुळे धाक निर्माण करा', अशी चिथावानी निलेश घायवळ याच्याकडून देण्यात आली होती.
advertisement
निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई
दरम्यान, निलेश घायवळ यानेच टोळीतील नंबरकारींना मोकळीक दिल्याने कोथरूडमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे आता पुण्यातील गुन्हेगारीला चाप कधी बसणार? असा सवाल विचारला जात आहे.
नेमकं काय झालं होतं?
advertisement
रस्त्यात थांबलेल्या तरुणांनी साईड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी प्रकाश धुमाळ याच्यावर 17 सप्टेंबर रोजी गोळीबार करुन जखमी केले होते. त्यानंतर काही अंतरावरील सागर कॉलनीमध्ये वैभव तुकाराम साठे याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ माजली होती. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात दोन खुनाचा प्रयत्न करुन रात्रीतून 6 जणांना अटक केली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'दहशत कमी होतीये, धाक निर्माण करा', निलेश घायवळनेच रचला होता 'कोथरूड'चा प्लॅन, धक्कादायक माहिती समोर!