फॉर्च्युनरमध्ये बसवलं, डोक्यात गोळी झाडली अन् खाली फेकून गाडी अंगावरून नेली, पुण्यातला हत्येचा VIDEO
- Published by:Sachin S
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
एका प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या इसमाची फॉर्च्युनर कारमध्ये गोळी झाडून हत्या केली. हत्येचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड: पुण्याचं बिहार झालं की उत्तर प्रदेश झालं, असा साहजिक प्रश्न सगळ्यांना पडला. कोयत्या गँगचा उच्छाद, गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच एक मन विचलित करणारा व्हिडीओ समोर आला आहे. एका प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या इसमाची फॉर्च्युनर कारमध्ये गोळी झाडून हत्या केली. हत्येचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील आळंदी-दिघी रोड परिसरात अलंकापुरम 90 फुटी रोडवरील श्री साई रोड कॅरिअर परिसरात ही घडली. नितीन गिलबिले (वय ३७) असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिले यांना बोलायचं म्हणून भेटायला बोलावलं. फॉर्च्युनर कारमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर अलंकापूरम इथं श्री साई रोड कॅरिअर इथं जाऊन गाडी थांबली. त्यांनी आपली फॉर्च्युनर रस्त्याच्या बाजूला लावली. कारमधून अमित पठारे याने ड्रायव्हर सीटवरून खाली उतरला आणि रिव्हॉल्व्हर काढली आणि नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडली. पहिली गोळी झाडल्यानंतर आणखी एक गोळी झाडली.
advertisement
त्यानंतर सोबत असलेल्या विक्रांत ठाकूर याने दुसऱ्या बाजूला जाऊन नितीन गिलबिले यांचा मृतदेह कारमधून खाली पाडलं. त्यानंतर अमित ठाकूरने गाडी सुरू केली आणि तिथून पळून गेले. त्यावेळी नितीन गिलबिले यांच्या पायावरून कार गेली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद धाला.
गोळीबाराची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना दोन रिकामी काडतुसं सापडली. दोन राऊंड फायर करण्यात आले होते. या हल्ल्यात गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार असलेले अमित पठारे आणि ठाकूर याचा शोध घेत आहे. गिलबिले यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. अद्याप हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 9:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
फॉर्च्युनरमध्ये बसवलं, डोक्यात गोळी झाडली अन् खाली फेकून गाडी अंगावरून नेली, पुण्यातला हत्येचा VIDEO

