Uddhav Thackeray: भाजपच्या 'कटेंगे तो बटेंगे'ला ठाकरेंचे प्रत्युत्तर,''आता जर चुकाल, तर...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या 'कटेंगे तो बटेंगे' मोहीमेला प्रत्युत्तर दिले.
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली. वरळी येथील पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे संबोधित केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी युती मागील भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या 'कटेंगे तो बटेंगे' मोहीमेला प्रत्युत्तर दिले.
मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची आज घोषणा करण्यात आली. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा या पूर्वीचं होणार होती. पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाली होती. वरळी येथील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले.
advertisement
'कटेंगे तो बटेंगे'ला ठाकरेंचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश काय सत्यनारायणाचा कलश म्हणून आणले नाही ठाकरे कुटुंबीय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी लढत होती. मुंबईचे लचके तोडण्यासाठी मनसुबे रचले जातोय. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. मुंबईला महाराष्ट्रापासून दुर करणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तुटु नका फुटु नका मराठीचा वसा सोडू नका असे त्यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत भाजपने 'कटेंगे तो बटेंगे'म्हटले. आता आम्ही देखील मराठी माणसाला सांगतोय, ''आता जर चुकाल, तर संपाल', उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य भाजपच्याविरोधातील मराठी माणसांसाठीची भूमिका असल्याचे समोर आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: भाजपच्या 'कटेंगे तो बटेंगे'ला ठाकरेंचे प्रत्युत्तर,''आता जर चुकाल, तर...''








