Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार, कारण काय?

Last Updated:

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आतापासूनच गाजायला सुरूवात झालीय. 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार, कारण काय?
विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार, कारण काय?
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आतापासूनच गाजायला सुरूवात झालीय. 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिवसेनेने टीका केली आहे, तर शिवसेनेच्या या टीकेला ठाकरे गटाकडूनही तसंच प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.
उद्धव ठाकरेंनीही त्यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतूनच लढवणार असल्याचं आधीच स्पष्ट केलंय. परिणामी आगामी निवडणुकीच्या संदर्भातील रणनितीच्या दृष्टीकोनातून उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून जिव्हारी लागणारी टीका केली आहे. 'सोनिया गांधी यांचं किंवा राहुल गांधी यांचं काही काम असेल म्हणून ते आज्ञेच पालन करण्यासाठी येत असतील', असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
advertisement
नरेश म्हस्केंनी दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते पेटून उठले नसते तरच नवल. गुजरातच्या आज्ञेचं पालन करण्याची सवय झाल्याचा परिणाम नरेश म्हस्केंवर झाल्याचा जोरदार पलटवार ठाकरे गटाचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मागील दोन वर्षांपासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडत असतात. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी त्यांना कोणताही मुद्दा पुरेसा ठरतो. आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा खणाखणी सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement