'गिरीश महाजनांनी भूखंड लाटले', पार्थ पवारांचा उल्लेख करत उन्मेष पाटलांचे खळबळजनक आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
विजय वाघमारे, चाळीसगाव: शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
“गिरीश महाजन यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था आणि इतर माध्यमातून भूखंड लाटले आहेत. भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला तर प्रकार हा फक्त नमुना आहे. सॅम्पल आहे. यामागचं खरं विद्यापीठ म्हणजे बीएचआर आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप उन्मेष पाटील यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
advertisement
त्याचप्रमाणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही उन्मेष पाटील यांनी जोरदार टीका केली. “मंगेश चव्हाण हा पाठीत खंजीर खुपसणारा नेता आहे. मी आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे त्याचे पहिली दोन उदाहरणे आहेत. आता पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रकरणात त्यांचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे,” असे त्यांनी म्हटले.
चाळीसगावातील एमआयडीसी परिसरात शेकडो कोटींच्या गौण खनिज चोरीचा आरोपही त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या गटावर केला. “मी कामांमधून टक्केवारी घेत नाही, पण मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावची लूट चालू आहे. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही लूट यात्रा काढणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
उन्मेष पाटील यांनी शेवटी असा सवाल उपस्थित केला की, “अकरावी-बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला? हा पैसा मेहनतीने कमावला की जनतेला लुटून?”, असा थेट सवाल त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून केला.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
November 07, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'गिरीश महाजनांनी भूखंड लाटले', पार्थ पवारांचा उल्लेख करत उन्मेष पाटलांचे खळबळजनक आरोप


