Washim News : समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या व्हॅक्सीन चोरी,आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Published by:Prashant Gomane
- Written by:Kishor Gomashe
Last Updated:
वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या वॅक्सीनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे.
Washim News : किशोर गोमाशे, वाशिम : वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या वॅक्सीनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे.या घटनेत 38 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
भिवंडी येथून नागपूर मार्गे कोलकत्ता इथं डिलिव्हरीसाठी निघालेल्या कंटेनर (MH04JK7054) मधील वॅक्सीनचे 46 बॉक्स अज्ञात चोरट्यांनी 23 जुलै रोजी चालत्या कंटेनरचे कुलूप कापून चोरल्याची घटना घडली होती.या घटनेची तक्रार कंपनीने कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात केली होती. तसेच या संबंधित गुन्ह्याचीही नोंद झाली होती.
त्यानुसार पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या तब्बल 85 हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला. त्यानंतर हे आरोपी गोवा येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरीसाठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून चार आरोपींना अटक केली. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत घुडावद यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.
advertisement
या कारवाईदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक व स्कॉर्पिओसह एकूण 38 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचं कबूल केलं आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच 11 गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत देखील यांच्यावर कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान वॅक्सीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आल्याने अनेक मोठे गुन्हे उघडकीस होणार आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
Location :
Washim,Maharashtra
First Published :
September 08, 2025 5:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Washim News : समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या व्हॅक्सीन चोरी,आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त