बुलाती है मगर..जाने का नही! महिलेनं घरी बोलवलं अन्.., डोंबिवलीत ज्वेलर्स मालकासोबत घडलं नको तेच
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
डोंबिवली शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं एका सराफा व्यावसायिकाला घरी बोलवून नको तेच कृत्य केलं आहे.
डोंबिवली: डोंबिवली शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं एका सराफा व्यावसायिकाला घरी बोलवून नको तेच कृत्य केलं आहे. आरोपी महिलेनं दागिन्यांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने एका ज्वेलर्सला घरात बोलावून घेतलं होतं. यानंतर आरोपींनी ज्वेलर्सला ओलीस ठेवून त्याच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली आहे. ही थरारक घटना डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथील जय मल्हार इमारतीच्या पाचव्या मजल्यावर २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
नारायणलाल रावलं असं पीडित ज्वेलर्सचं नाव असून डोंबिवली परिसरात त्यांचं ज्वेलर्स दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी वैशाली जाधव नावाच्या एका महिलेने रावल यांच्या दुकानात जाऊन दागिन्यांची ऑर्डर दिली होती. रावल यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितल्यावर या महिलेने त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि तिची मुले अॅडव्हान्स रक्कम देतील, असं सांगितलं.
advertisement
या भेटीनंतर तब्बल बारा दिवसांनी, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने रावल यांना फोन केला आणि अॅडव्हान्स देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर बोलावून घेतले.
ओलीस ठेवून बेदम मारहाण
रावल हे दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता, त्या घरात दोन अनोळखी तरुण उपस्थित होते. त्यांनी आई थेरपीसाठी बाहेर गेल्याचे सांगून रावल यांना घरात घेतले. रावल घरात येताच, त्या दोन पुरुषांनी घराचा दरवाजा बंद केला, बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला आणि रावल यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर त्यांनी रावल यांना दोरीने घट्ट बांधून ओलीस ठेवले.
advertisement
दरोडेखोरांनी रावल यांच्या जवळ असलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लुटला आणि त्यानंतर ते तिघेही (दोन पुरुष आणि त्यांची साथीदार महिला) घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर रावल यांनी स्वतःची कशीबशी सुटका केली आणि थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. नारायणलाल रावल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात पुरुष आणि संबंधित महिलेविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके वेगाने तपास करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 25, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलाती है मगर..जाने का नही! महिलेनं घरी बोलवलं अन्.., डोंबिवलीत ज्वेलर्स मालकासोबत घडलं नको तेच


