advertisement

सज्जाद नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा, मुस्लिम मतांवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार

Last Updated:

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, यावर भाजपने सडकून टीका केली आहे, तर काँग्रेसने पलटवार केला आहे.

सज्जाद नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा, मुस्लिम मतांवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार
सज्जाद नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा, मुस्लिम मतांवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे, त्याआधी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. सज्जाद नोमानींच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आशिष शेलार यांनी केलेल्या या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे.
'आशिष शेलार स्वत:ला आशिष कुरैशी म्हणवून घेतात. पण आता त्यांना व्होट जिहाद, हिंदू मुस्लिम या विषयाशिवाय दुसरं काही सुचत नाहीये, कारण ते निवडणूक हरताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सत्तेत येताना दिसत आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून खालपर्यंत सगळे हिंदू मुस्लिम करताना दिसत आहेत. देशातही झालं, इतर राज्यांमध्येही तेच आहे. परमांदा मुस्लिम उत्थान समितीने आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचं आशिष शेलार यांनी कालच सांगितलं, त्याबद्दल त्यांनी स्वागत केलं आहे. याला काय म्हणावं? असा आमचा आशिष कुरैशींना सवाल आहे. हा दुतोंडीपणा चालणार नाही', असं प्रत्युत्तर सचिन सावंत यांनी दिलं आहे.
advertisement
'नोमानींनी पाठिंबा देऊन काय चूक केली? लोकशाहीमध्ये कुणाला पाठिंबा द्यावा, न द्यावा हा त्यांचा वैयक्तिक विषय असतो. परमांदा मुस्लिम उत्थान समितीने आशिष शेलारांना पाठिंबा जाहीर केला, मग त्याला काय म्हणावं? त्यालाही असंच काही नाव ते देणार का. मुस्लिम समाज तुम्हाला मतदान का करत नाही, तो तुमचा इतका तिरस्कार का करतो? याचा विचार सत्ताधारी पक्षाने केला नाही आणि त्याचाच त्रागा करत राहिले, तर याला अर्थ नाही. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे', असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सज्जाद नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा, मुस्लिम मतांवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement