'...तर तुम्हाला जुलाब होतील', शरद पवारांच्या नेत्याचं बोलताना ताळतंत्र सुटलं
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकदा नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. यातच भोसरी विधानसभेचे माजी आमदार आणि शरद पवारांच्या नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकदा नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. यातच भोसरी विधानसभेचे माजी आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला नक्की मतदान करा, मात्र मतदान करण्यासाठी तुम्ही विरोधकांचे पैसे घेतले तर तुम्हाला जुलाब होतील, असं वादग्रस्त वक्तव्य विलास लांडे यांनी केलं आहे.
advertisement
मतदान करणं हे पवित्र काम आहे, मात्र आपलं मत विकलं जाऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असं आवाहन विलास लांडे यांनी मतदारांना केलं आहे.
काय म्हणाले विलास लांडे?
'कुणीही येतील पैसे देतील, त्या पैशांचा विचार करू नका. ते पैसे घेतले तर तुम्हाला जुलाब होतील. जुलाब होतील आणि त्यावर 2 हजार रुपये जातील. हजार रुपये घेतले तर तुम्हाला जुलाब होतील, याची काळजी आपण घ्या. मतदान पवित्र आहे', असं विलास लांडे म्हणाले आहेत.
advertisement
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून महेश लांडगे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित गव्हाणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भोसरी विधानसभा निवडणुकीत लागोपाठ 2 वेळा 2014 आणि 2019 साली भाजपच्या महेश लांडगे यांचा विजय झाला आहे.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2024 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...तर तुम्हाला जुलाब होतील', शरद पवारांच्या नेत्याचं बोलताना ताळतंत्र सुटलं