ट्युशनला सायकलवरून निघाली, ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, पोरगी चाकाखाली, जागेवरच मृत्यू

Last Updated:

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे कळते.

वर्धा अपघात
वर्धा अपघात
नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्याच्या आर्वीत भीषण अपघातात रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने सायकलवर चाललेल्या मुलीला चिरडल्याने १५ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मृत तरुणी सायकलने ट्युशनसाठी जात होती. मात्र ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने किंबहुना ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांचा आक्रोश काळीज चिरणारा होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ट्युशनला सायकलवरून निघाली, ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, पोरगी चाकाखाली, जागेवरच मृत्यू
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement