Wardha : प्रेमाचा खुनी ट्रँगल! 'ती' एक आणि 'ते' दोघे, वर्ध्यातील मन सून्न करणारी घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वर्ध्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एकाच मुलींवर दोन मुलांचे प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून दोन्ही मुलांमध्ये भयंकर वाद झाले होते.
Wardha Crime News : नरेंद्र मते, वर्धा : वर्ध्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एकाच मुलींवर दोन मुलांचे प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून दोन्ही मुलांमध्ये भयंकर वाद झाले होते. या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.सलीम सबदर शा (वय 30, रा. संजय नगर, आर्वी) असे या मुलाचे नाव आहे. वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौकात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.तसेय या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम आणि निखिल या दोन तरूणांचे एकाच मुलीवर प्रेम होते.त्यामुळे काही काळापासून या मुलीवरून दोघांमध्ये वाद सूरू होते. आज हे दोघेही वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौकात भेटले होते. या दरम्यान भांडणाचा वाद आज टोकाला पोहोचला होता. यावेळी सलीम आणि निखिल यांच्यात भंयकर बाचाबाची झाली.या बाचाबाची दरम्यान निखिलने आपल्याकडील धारदार शस्त्र काढून सलीमवर वार केले होते. हे वार इतके गंभीर होते की क्षणात समील रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. त्यानंतर ही घटना पाहून तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेला आणि गंभीररित्या जखमी झालेल्या सलीमला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत माळवली होती.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी निखिल बुरे यास अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आर्वी शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 07, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : प्रेमाचा खुनी ट्रँगल! 'ती' एक आणि 'ते' दोघे, वर्ध्यातील मन सून्न करणारी घटना