चांद्रयान-3 मध्ये विराजमान झाले गणपती बाप्पा; पाहा कसा साकार झाला हटके देखावा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्ध्यातील या संस्थेचा गणपती बाप्पा हा चांद्रयान-3 च्या देखाव्यात विराजमान झाला आहे.
वर्धा, 20 सप्टेंबर: गणेशोत्सव हा चिमुकल्यांपासून वृद्धांसाठी जल्लोषाचा सण असतो. त्यामुळे वर्धेकरांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पाला आकर्षक सजावटीमध्ये विराजमान करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे औंजळ बहुउद्देशीय संस्थेचा गणपती बाप्पा हा चांद्रयान-3 च्या देखाव्यात विराजमान झाला आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा आकर्षक देखावा तयार केला असून देखाव्यावर वर्धेकरांकडून कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.
कसा तयार झाला आकर्षक देखावा ?
पेन, पेन्सिल, थर्माकोल, एक मोठं ताट, फेविकॉल, कात्री, कापूस , कागद, स्केचपेन आणि लाइट्स या वस्तू वापरून आकर्षक चांद्रयान-3 च्या थीमने डेकोरेशन करण्यात आलं आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ता मुते आणि संस्थेच्या चिमुकला विद्यार्थ्यांनी मेहनत करून हा आकर्षक देखावा उभा केला आहे आणि या आकर्षक देखाव्यामध्ये लाडका गणपती बाप्पाला विराजमान केले आहे. अगदी कमी खर्चात आणि कौतुकास्पद कल्पनेने हा देखावा तयार झाला आहे.
advertisement
काय आहे वर्ध्यातील औंजळ संस्था ?
औंजळ बहुउद्देशीय संथा ही सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत तर आहे. संस्थेत दरवर्षी गणपती मूर्ती नवी आणली जात नाही तर मारबलच्याच गणपतीची पूजा होते. आणि सजावटीच्या माध्यमातून मात्र विद्यार्थ्यांच्या कलाकडून मिळावा तसेच एखादी सामाजिक संदेश देऊन विद्यार्थ्यांना जनजागृती करणे हा उद्देश असतो.
advertisement
विद्यार्थ्यांना दिला संदेश
भारताने चंद्रावर जाऊन देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच आपणही चांगला अभ्यास करून मोठं होऊन चांगली कामगिरी करून यशाची शिखरे गाठू शकतो. असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि सोबतच सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 20, 2023 5:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
चांद्रयान-3 मध्ये विराजमान झाले गणपती बाप्पा; पाहा कसा साकार झाला हटके देखावा