130 वर्ष जुने गणेश मंदिर आजही विकासाच्या प्रतीक्षेत, पाहा काय आहे इतिहास

Last Updated:

130 वर्ष जुनं हे ऐतिहासिक मंदिर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

+
News18

News18

वर्धा, 20 सप्टेंबर : गणेशोत्सव म्हणजे ऊर्जा वाढवणारा, आणि आनंद, हर्षोल्लासाचा उत्सव असतो. आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झालंय. सार्वजनिक गणेश मंडळानंही आकर्षक देखावे तयार केले असून ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या गणपती मंदिरामध्येही दर्शनासाठी गर्दी असते. वर्धा जिल्ह्यात 130 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास आपण पाहूया
कुठे आहे मंदिर?
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे जवळजवळ 130 वर्षांच्या पूर्वी बांधण्यात आलेलं हे गणपतीचं आणि शीतला मातेचे मंदिर आहे. पिंपळाच्या अतिशय जुन्या वृक्षाखाली देवीची स्थापना करण्यात आली होती. त्याच ठिकाणी गणपतीचेही मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर वेगवेगळे उत्सव साजरे होतात. गणेशोत्सवात आणि नवरात्रात भक्तांची विशेष गर्दी असते.
advertisement
काय आहे इतिहास?
इंग्रजांनी 1880 मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा नदीवर रेल्वे पूल बांधला आणि पुलगाव शहर उदयास आले. रेल्वे सुरू झाल्याने या भागाचा विकास होऊ लागला. 1890 मध्ये चार एकर जागेत गणेश आणि शीतला माता मंदिराची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून मंदिरात पुजारी म्हणून पंडित मदनलाल शर्मा कार्यरत होते. त्यांचा मुलगा पं कमलनयन शर्मा यांनीही मंदिराची सेवा केली, त्यांच्या निधनानंतर वंशपरंपरागत पुजारी म्हणून सध्या पं दिलीप कमलनयन शर्मा कार्यरत आहेत..
advertisement
त्या काळातील हे गणेश मंदिर आजही त्या स्थितीत आहे धार्मिक प्रवृत्ती आणि निष्ठा या भावनेतून गणेश जिनिंग आणि प्रेसिंग तर 1889 मध्ये पुलगाव कॉटन मिल सुरू झाली. त्या कपडा उद्योगाला ट्रेडमार्कही श्री गणेश ठरला.  या दोन्ही देवता देवता जागृत मानल्या जातात.
advertisement
1902 मध्ये पुलगाव नगर परिषदेची स्थापना होऊन नगर रचना करण्यात आली. 1910 मध्ये जागतिक बाजारपेठेतील आर्थिकमंदीमुळे शहरातील अनेक उद्योग चंद करून भांडवलदारांनी उद्योगांची विक्री केली. 1955-56 मध्ये मालगुजारी संपली. 22 नोव्हेंबर 1995 रोजी गणेश आणि शितला माता देवस्थान ट्रस्टचे प्रकरण सहधर्मादाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ झाले. हे न्यायालयीन प्रकरण 19 वर्षे सुरू होते. 28 नोव्हेंबर २००६ रोजी निकाल लागला व देवस्थान ट्रस्टला अधिकार मिळाले. मध्यंतरी शहरात अनेक मोठी मंदिरे झाली; पण न्यायालयीन खर्च आणि उत्पन्न स्त्रोतांचा अभाव यामुळे या जागृत देवस्थानाचा विकास होऊ शकला नाही.
advertisement
इंग्रज राजवटीत 1893 पासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी देशप्रेम जागृत करण्याचे कार्य केले जात होते. शहरातील नागरिक आजही नवरात्र, गणेशोत्सव या मंदिराच्या प्रांगणात साजरे करतात. न्यायालयीन प्रकरणामुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते; पण भाविकांची श्रद्धा कायम आहे. वास्तविक, येथील प्रशस्त जागा, आणि 130 वर्षांचा इतिहास, तसेच भाविकांची श्रद्धा पाहता शासनाने धार्मिक स्थळाचा दर्जा आणि विकास निधी देणे गरजेचे आहे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
130 वर्ष जुने गणेश मंदिर आजही विकासाच्या प्रतीक्षेत, पाहा काय आहे इतिहास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement