Wardha Crime : लाल दिव्याच्या गाडीत आले अन् साडेचार कोटी लुटले; पोलिसांनी 5 तासांत लावला छडा
- Published by:Rahul Punde
 
Last Updated:
Wardha Crime : नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात वाहनावर लाल दिवा लावून साडेचार कोटी लुटले होते.
वर्धा, 8 सप्टेंबर (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर तब्बल साडेचार कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी जे केलं त्यानंतर सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत. कारसह साडेचार कोटी पळवणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या दबंग कामगिरीनंतर 50 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
गुजरातचे व्यापारी कमलेश शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेसिंग सोलंके हा गत काही दिवसांपासून त्यांच्या नागपूर कार्यालयात कामास आहे. नागपूर कार्यालयाचे नितीन जोशी यांच्याकडून 4 कोटी 52 लाख रुपये घेवून सोलंके हा कारने नागपुरातून हैद्राबादकडे निघाला होता. वाटेत समुद्रपूर तालुक्यातील पोहणा येथे एक कार सायरन वाजवीत त्यांच्या मागे आली. त्यातून चार लोक उतरले. या चौघांनी प्लास्टिकच्या काठ्यांनी दरडावून सोळंके यास गाडीतून खाली खेचले. मारहाण करीत पैश्याबाबत विचारणा केली.
advertisement
डोक्यावर बंदूक ताणत धमकी दिल्याने सोलंकेने रक्कम दिली. त्यानंतर चौघेही कारने पसार झाले. सोलंकेने लगेच वडनेर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथक सज्ज केले. या दहा पथकांनी लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू केला. तांत्रिक तपास कामी आला. अवघ्या पाच तासात तीन आरोपी गळास लागले. वर्धा पोलिसांनी अल्प वेळेत वेगवान कारवाई केल्याने सर्वजण कौतुक करत आहेत. पोलिसांनी तीन कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही जप्त केलं आहे. पोलिसांनी तीन कोटी 46 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत 100 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या 15 पथकांनी या प्रकरणाचा छडा लावला.
advertisement
पोलिसांना 50 हजारांचे बक्षिस
view commentsवर्धा पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलीस विभागाची मान अभिमानाने उंचावली आहे. यासाठी तपास चमूला 50 हजारांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आरोपींना नागपूरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याकरिता नागपूर, अमरावती येथील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचं सहकार्य मिळालं. नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात ही घटना घडली होती.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 08, 2023 11:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha Crime : लाल दिव्याच्या गाडीत आले अन् साडेचार कोटी लुटले; पोलिसांनी 5 तासांत लावला छडा


