Weather Update: विकेण्डला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा गारठणार, कोकण-मराठवाड्यात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात १४ डिसेंबरला कडाक्याची थंडी, १५ आणि १६ डिसेंबरला तापमान वाढण्याची शक्यता; विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत.
थंडीच्या कडाक्याने बेजार झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील तीन दिवसांत हवामानाचा एक वेगळा अनुभव असणार आहे. एका बाजूला गारठा वाढल्याने नागरिक थंडीचा अनुभव घेतील, तर दुसरीकडे तापमान वाढण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही 'कोल्ड वेवची' परिस्थिती चिंतेचा विषय बनली आहे.
48 तास कोल्ड वेव कायम राहणार
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १३ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी राहणार आहे. १४ डिसेंबरपर्यंत देशाच्या अनेक भागांतून कमी होत जाईल. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात १४ डिसेंबरपर्यंत किमान तापमानात थोडी घट कायम राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, सकाळच्या वेळी नागरिकांना तीव्र थंडी अनुभवायला मिळेल.
advertisement
पुन्हा तापमान वाढणार
त्यानंत 15 आणि 16 डिसेंबर रोजी शीत लहरीचा प्रभाव कमी झाल्यानंतर, हवामान प्रणालीतील बदलांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होण्याची चिन्हे आहेत. विदर्भ आणि मराठवाडा इथे हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, कडाक्याच्या थंडीतून काहीसा दिलासा मिळून दिवसाचे आणि रात्रीचे तापमान थोडे वाढेल.
advertisement
16 डिसेंबरनंतर पुन्हा बदलणार हवामान?
मध्य महाराष्ट्रातही १६ डिसेंबरनंतर पुढील ५ दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, १४ तारखेला थंडीचा जोर जाणवेल, पण १५ आणि १६ तारखेला तापमान वाढल्याने गारठा कमी होईल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. शीतलहरीचा थेट परिणाम त्यांच्या रबी पिकांवर होऊ शकतो. कमी झालेले तापमान आणि वाढलेला गारठा ज्वारी, गहू आणि हरभरा यांसारख्या पिकांसाठी हानिकारक ठरू शकतो.
advertisement
तापमान वाढल्यास हा धोका टळेल, पण सध्याच्या वातावरणातील बदलांमुळे शेतीचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. महाराष्ट्र १४ डिसेंबरला थंडीच्या लाटेत राहील, पण १५ आणि १६ डिसेंबरला किमान तापमानात वाढ होऊन नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: विकेण्डला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा गारठणार, कोकण-मराठवाड्यात काय स्थिती?










