Diabetes Risk : डायबिटीजचे हे 2 प्रकार माहितीये? 'या' साध्या चुकांमुळे होऊ शकतो दुसऱ्या प्रकारचा मधुमेह
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Diabetes types and causes : हल्ली डायबिटीजचे प्रमाण आपल्याकडे वाढत आहे. पूर्वी विशिष्ठ वयानंतर वृद्धांमध्ये डायबिटीज व्हायचा किंवा जन्मापासूनच काही लोकांना डायबिटीज असायचा. मात्र आता याचे प्रमाण वाढले आहे.हल्ली मधुमेह कोणत्याही वयाच्या लोकांना होऊ शकतो. यासाठी निश्चितच काही कारणं असतात. आज आपण मधुमेहाचे प्रकार आणि त्याच्या कारणांबद्दल माहिती घेणार आहोत.
advertisement
टाइप 1 मधुमेह लहान मुलांमध्ये होतो. हा 9-10 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये आणि 17-18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो. टाइप 1 मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो, म्हणून मुलांना नियमित इन्सुलिन दिले जाते. या स्थितीत, मुलाचे शरीर स्वतःहून इन्सुलिन तयार करू शकत नाही. म्हणून वैद्यकीय लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







