Weather Update: IMD लाही दिला चकवा, मुंबईत अचानक पाऊस कसा आला? कारण काय

Last Updated:

२०२६च्या सुरुवातीला वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचलमध्ये हिमवृष्टी, दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस व थंडी, महाराष्ट्रात तापमानात मोठी घट आणि मुंबईत पावसाने स्वागत.

News18
News18
नव्या वर्षाची सुरुवात अगदी अनपेक्षित झाली आहे. थंडी सोबत धुवाँधार पावसानं आगमन केलं आणि २०२६चं स्वागतही केलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाने आपलं रूप बदललं आहे. सध्या उत्तर भारताच्या डोंगराळ भागात 'वेस्टर्न डिस्टरबेंस' सक्रिय झाल्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचलमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू झाली आहे. याचा परिणाम म्हणून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला असून, आता ही थंडीची लाट महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.
बर्फाळ वाऱ्यांचा भडिमार, सायक्लोनिक सर्क्युलेशनचा इफेक्ट
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पंजाबच्यावर एक 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' तयार झालं आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे ढग तुर्की, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ओलांडून भारतात दाखल झाले आहेत. यामुळे येत्या १ आणि २ जानेवारीला दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात 'कोल्ड डे'ची स्थिती असेल. म्हणजेच दिवसाही सूर्यदर्शन न झाल्यामुळे कडाक्याचा गारठा जाणवणार आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर तिथून येणारे बोचरे वारे राजस्थान आणि गुजरातवरून थेट महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत. २ जानेवारीपासून महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ-मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा वेगाने खाली येईल, ज्यामुळे शीतलहरीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. मुंबई-कोकणात मात्र हवामानात मोठे बदल होणार आहे. मुंबई आणि पालघरमध्ये आधीच ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र रात्रीचा गारठा वाढणार आहे. मुंबईसह उपनगर, नवी मुंबईत आज पहाटेपासून पाऊस सुरू आहे. एक तासाहून अधिक काळ या भागात ढगाळ हवामानासह हलका पण संततधार पाऊस सुरू आहे. सॅटेलाईट निरीक्षणांनुसार, उत्तर कोकणासह मुंबईच्या आसपासच्या परिसरात पावसाचे सावट असून, नवीन वर्षाचे स्वागत पावसाच्या थेंबांनी झाले आहे. यामुळे वातावरणात गारवा पसरला असून मुंबईकरांची २०२६ ची सुरुवात ओल्या चिंब सकाळी झाली आहे.
advertisement
३ आणि ४ जानेवारीपासून थंडीचा जोर अधिक वाढेल. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये तापमानात २ ते ४ अंशांची घसरण होईल. हे थंड वारे पुढे बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचतील. त्यामुळे जानेवारीचा पहिला आठवडा संपूर्ण भारतासाठी 'हाडं गोठवणारा' ठरणार आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर होणार आहे. तिथे तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: IMD लाही दिला चकवा, मुंबईत अचानक पाऊस कसा आला? कारण काय
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement