Honey Warm Water : मध गरम पाण्यात टाकून का पिऊ नये, असं मध प्यायल्याने काय होतो परिणाम?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honey And Warm Water Effects : अनेक जण सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यात मध टाकून पितात, कित्येकांच्या रूटिनचा हा भाग आहे. म्हणे यामुळे वजन कमी होतं. पण डॉक्टर मात्र गरम पाण्यात टाकून न पिण्याचा सल्ला देतात.
advertisement
आयुर्वेदात मध म्हणजे मधू हा एक औषधी पदार्थ मानला जातो पण तो गरम पदार्थात मिसळू नये, असा नियमही आयुर्वेदात सांगितला आहे. आयुर्वेदानुसार गरम केल्यावर मधाचे गुणधर्म बदलतात. गरम पाण्यात मध टाकल्यास तो पचायला जड होतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास आम म्हणजे शरीरात विषद्रव्य साचू शकतात, असं आयुर्वेद सांगतो.
advertisement
advertisement
advertisement









