Solapur: दिरांनी मारलं, साडी काढून अत्याचार केला अन् नवरा म्हणतो 'ही मेली नाही का अजून'? सोलापूरमधील 'वैष्णवी'ची भयानक कहाणी
- Published by:sachin Salve
Last Updated:
एका विवाहित महिलेला दिर आणि जाऊ यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, दिरांनी सगळ्यांच्यासमोर अत्याचार केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या लोकांना अटक करण्यात आली आहे. पण सोलापूरमधून घरगुती हिंसाचाराचं भयानक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित महिलेला दिर आणि जाऊ यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, दिरांनी सगळ्यांच्यासमोर अत्याचार केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. यामध्ये नवऱ्यानेच सगळ्यांना साथ दिली. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
सोलापूरमधील टेंभुर्णी इथं ही घटना घडली आहे. पीडित विवाहितेला दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी, रॉडच्या साह्याने मारहाण करत विष पाजण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसापासून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ही पीडित महिला उपचार घेत आहे. पीडितेनं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 14 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पीडित महिलाचा पती सतीश भोसले यांचं करमाळा चौक, टेंभूणी इथं भोसले ऑटोमोबाईल्स नावाचे दुकान आहे. पीडित महिला आणि तिच्या दोन जाऊ निलीता, पुजा, दिर संतोष असे सगळे शेती करतात. तर दिर निलेश भोसले हा वकिली व्यवसाय करतो. 2006 मध्ये पीडितेचं सतीश भोसले यांच्यासोबत लग्न झालं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली होती. तिने तेव्हा टेंभुर्णी पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या होत्या. १३ वर्षापूर्वी सर्वांवर कलम ४९८ चा गुन्हा नोंदवला होता. तो ४ वर्षांने आम्ही तुला सुखात नांदवू' असं लेखी लिहून दिल्यावर वाद मिटवला होता. पण त्यानंतर पीडितेला मारहाण झाली आणि तिच्यावर दिरांनी अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं केली आहे.
advertisement
पीडितेनं पोलिसांकडे केलेली तक्रारीची प्रत जसेच्या तशी
पण, अलीकडे ११ मे २०२५ रोजी घरी काम करत असताना दोन्ही दिर संतोष, निलेश, दोन जाऊ निलीता, पुजा, माझा लहान मुलगा सार्थक हे आमचे शेतातील डाळींबाचे बागेत काम करण्यासाठी गेले होते. ११:३० वा. वे सुमारास माझे दोन्ही दिर घरी आले त्यावेळी मी स्वयंपाक खोलीत काम करीत होते. त्यांनी मला ओढत फरफटत घराच्या हॉलमध्ये घेवून आले आणि आतून कडी लावली माझ्या नरड्याला कोयता लाऊनवर अत्याचार केला. मी म्हणाले 'मी तुमची वहिणी आहे, वहिणी आई सारखी असते' पण ते बळाचा वापर करून अत्याचार केला. माझा नवरा सतीश वडील नागनाथ यांना बोलवा आणि मोठ मोठ्याने ओरडत वाचवा वाचवा म्हणत होते पण बाहेर सासू विमल व सासरे लक्ष्मण हे त्याच्या मनासारखे होत असल्याने ते गप्प बसले होते. त्यावेळी दिर निलेश हा मला म्हणाला की, तू तुझ्या लहान मुलाला सार्थकला काय सांगितलं आहे. त्यानंतर दिर संतोष हा म्हणाला की, 'हिलाच लय आग आहे, थांब तुला दाखवतो दिर निलेश म्हणाला की तुझ्या नवऱ्याने तुला जीवे मारण्यास सांगितलं आहे, तू काय आत्ता जगत नाही' असे म्हणून ते दोघे माझे शरीरावर हात फिरवून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यानंतर माझ्या दोन्ही जाऊ निलीता व पुजा तिथं शेतातून आल्या. बाहेरु दार वाजऊ लागल्यानंतर या दोघांनी अश्लील चाळे थांबऊन दार उघडलं अन् मीच त्याच्यावर आळ घेते म्हणत त्या दोघी पण मला मारहाण करू लागल्या.
advertisement
'विष पाजू नका, तिला मरु द्या'
दिर निलेश म्हणाला मी वकील आहे आणि मला आता कोर्टाला महिनाभर सुट्टी आहे, हिचा माज जिरवतो दिर संतोष याने त्यांचे हातात लाकडी दांडके घेतले. त्यांनी त्यांचे जवळील १ दांडके माझे दिरांकडे दिले. त्या दोघांनी काठीने माझ्या मांडीवर, पाठीवर, पायावर, हातावर तसंच मागील बाजूवर जोरजोरात १ तासभर मारून मला जखमी केलं. तसंच दोन्ही जावांनी फरा वारीने माला मारुन मला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी दीर जाव पुजा हिने विषाची बाटली निलेश यांच्या हातात आणून दिली आणि बळजबरीने पाजन्याचा प्रयत्न केला. पण सासरे लक्ष्मण म्हणाले की, विष पाजू नका, तिला मरु द्या आणि सर्वाना मारण्यास प्रोत्साहन देत होते. मग तुच पी विष हे तु विष पिवून मर, तुझा काही उपयोग नाही, तु घराची अब्रू घालवतेस, आईघाले असे म्हणत होता. मी मोठ्याने ओरडत होते, परंतु त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला होता.
advertisement
'अरेरे ही अजून जिवंतच आहे का खूप कमी मारले निदान हिचा पाय तरी मोडायचा'
घरातला आवाज ऐकून अखेर शेजारी गोळा झाले असता त्यांनी १ तासांनंतर मारहाण बंद केली आणि तुला पोलिसात जाऊ देणार नाही मी वकील आहे. कायदा माझा खिशात आहे सांगत घाण शिव्या देत होता. त्यानंतर मी माझ्या घरात आमच्या खोलीत जावून रडत रडत साडी घालून कपडे सावरले खोलीचे दार लाऊन बसले. रात्री माझे पती सतिश दुकानात आले, हे आले त्यांना मी सगळा प्रकार सांगितला असता ते सगळ्यांसमोर म्हणाले की, 'अरेरे ही अजून जिवंतच आहे का खूप कमी मारले निदान हिचा पाय तरी मोडायचा' असं सांगून जेवायला निघून गेला. माझा नवराच माझी मदत करत नसल्याने मी कोणास काही न बोलता तशीच घरात बसून राहिली.
advertisement
'पोलिसांमध्ये तक्रार आणि ४ दवाखान्यात तपासणी'
रात्री ०९:०० वा. चे सुमारास माझा मोठा मुलगा सोहम हा घरी आल्यानंतर मी त्याला मला झालेली मारहाणीबाबत सांगितलं. मला चक्कर येत आहे. मला दवाखान्यात जायचे आहे त्याने असे म्हणाल्यानंतर गपचुप टेंभूणी येथील चोपडे हॉस्पिटल येथे गेलो. तिथे माझेवर प्राथमिक उपचार करून मला सकाळी परत, या असे म्हणाले. त्यानंतर दि. १२ मे २०२५ रोजी मी, माझे वडील नागनाथ मुरलीधर गायकवाड, भाऊ गणेश, बहीण प्रज्ञा पृथ्वीराज भोसले असे तक्रार देण्यासाठी टेंभूणी पोलीस ठाण्यात गेली असता तेथील पोलिसांनी आम्ही उपचाराकरीता दवाखाना यादी देवून सरकारी दवाखान्यात पाठविलं. आम्ही सरकारी दवाखाना येथे गेलो. तेथे उपचार झाल्यानंतर मी त्यांना माझे दोन्ही कानाला मार लागल्याचे सांगितलं. त्यांनी तेथे कानाचे डॉक्टर नसल्याने पुढील उपचाराकरीता कुडूवाडी इथं पाठविलं. आम्ही कुडूवाडी येथील सरकारी दवाखाना येथे गेलो. परंतु तेथे देखील कानाचे डॉक्टर नसल्याने त्यांनी पंढरपूर येथे घेवून जाणेस सांगितलं. मला चक्कर येवून कानातून रक्त वाहु लागल्याने मी पंढरपूर येथील लाईफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल झाले. सध्या माझ्यावर औषधोपचार चालू असून माझी प्रकृती चिंताजनक आहे.
तरी सर्व घरातील सदस्यांचा आणि दिर निलेश यांचा वारंवार शिवीगाळ, दमदाटी, मानसिक आणि शारीरिक अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता.
जबाबामध्ये फेरफार
मी हताश असल्याने त्या दोघांनी माझे शरीरावर हात फिरवून माझे xxx दाबून माझी, साडी काढून अत्याचार केला आहे. मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून माझा विनयभंग केला आहे. तसेच लाकडी दांडक्याने मांडीवर, पाठीवर, पायावर, हातावर व मागील बाजूवर जबर मारून मला जखमी केले आहे. तरी माझे दिर निलेश लक्ष्मण भोसले, दिर संतोष लक्ष्मण भोसले, दोन जाऊ निलिता संतोष भोसले, पुजा निलेश भोसले, सासरे लक्ष्मण श्रीपती भोसले, सासु विमल लक्ष्मण भोसले आणि त्यांना प्रवरुत्त करणारे माझे पती सतिश लक्ष्मण भोसले, या ७ जणांविरुद्ध दिरांनी अब्रु लुटण्याचा प्रयत्न केला. कानावर, शरीरावर जबर मारहाण केली आहे व अशा वारंवार कौटुंबील हिसा करुन मला विष पाजुन जिवे मारण्याचा प्रयत्न म्हणून माझी ७ जणांविरुध्द तक्रार आहे. पण टेंभुणी पोलीस आय.सी.यु.मध्ये उपचारादम्यान गोळे साहेब, मोरे साहेब जबाबासाठी लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे आयसीयु विभागात आले होते. पण मी जबाब देण्याच्या मानसिकतेत नव्हते तरी सुद्धा त्या पोलिसांनी काय लिहिलं मला माहीत नव्हतं. त्यांनी कोऱ्या पेपरवर परत काय लिहिले आणि शारीक प्रकृती गंभीर असल्याने मी त्यांना पुर्णपणे सांगु शकले नाही, दोन दिवसांनी माझा भाऊ गणेश नागनाथ गायकवाड पोलीस स्टेशनला गेले असता एफ.आय.आर. मध्ये मी सांगितलेला अत्याचार आणि येथील जबाब यात खूप तफावत आहे असे, जाणवले पलिसांनी माझ्यावर अन्याय केला आहे. एक महिला बेदम मार खाऊन चार ठिकाणी दवाखने बदलून हॉस्पिटल आय.सी.यु.मध्ये उपचारा दरम्यान, ३ पुरुष पोलिसांना काय जबाब देणार कसे सर्व सांगणार होते.
माझा दिर निलेश वकील असल्याने त्याना पाच लाख रुपये देऊन सर्व पोलीस माझावर अन्याय केला आहे. माझ्य नरड्यावर कोयता लाऊन माझ्यावर अत्याचार करुन ३०७ व ३७६ गुन्हा न दाखल करता. ३२४ व ७४ सारखा त्यांना दिलास देणारे कलम लावले आहेत. माझे मे. कोर्टासमोर अद्याप ही १६४ खाली जबाब सुद्धा नोंदवला नाही मी एक महिला आहे. सर्व तपास महिला अधिकारी यांनी करावा आणि जबाब ही महिला पोलीस यांनी घ्यावा हा झालेला तापास हा सर्व खोटा आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करुन स्वतःला संपवणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 23, 2025 9:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: दिरांनी मारलं, साडी काढून अत्याचार केला अन् नवरा म्हणतो 'ही मेली नाही का अजून'? सोलापूरमधील 'वैष्णवी'ची भयानक कहाणी