पोतं भरून तलवारी आणल्या, 22 जणांनी एकावर सपासप वार केले, नांदेडमधला 'मुळशी पॅटर्न'चा LIVE VIDEO

Last Updated:

तलवारीचे वार झेलत सागरचा भाऊ कसाबसा जीव वाचवून पळाला. पण सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. सागरवर तलवारीने अनेक वार करण्यात आले.

(नांदेडमधील घटना)
(नांदेडमधील घटना)
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड, 07 नोव्हेंबर : खंडणी न दिल्याने नांदेड शहरात एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोत्यात तलवारी भरून आणून 20 ते 22 जणांनी तिघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी रात्री ही घटना घडली. सागर यादव असं मृत्यू तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
मयत सागर पवार हा डेली निड्स आणि फायनान्स चालवतो. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवार याने त्याला खंडणी मागितली होती. पण सागर याने खंडणी देण्यास नकार दिला होता. खंडणी देण्यावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्यामुळे केशव पवार याने आपल्या गँगमधील 20 ते 22 जणांसोबत रात्री सागर यादव याला शोधत सराफा बाजारात आला. सोबत पवारने पोत्यात आणलेल्या एक एक तलवारी आणि खंजर काढत गँगने सागर यादव आणि त्याच्या भावासह अन्य एकावर हल्ला चढवला.
advertisement
तलवारीचे वार झेलत सागरचा भाऊ कसाबसा जीव वाचवून पळाला. पण सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. सागरवर तलवारीने अनेक वार करण्यात आले. अनेक गंभीर वार झाल्याने सागरचा तडफडून मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा घटनेने जुन्या नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी केशव पवारसह 20 ते 25 जणांविरोधात हत्या, खंडणी आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 17 आरोपींना अटक करण्यात आली असून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोतं भरून तलवारी आणल्या, 22 जणांनी एकावर सपासप वार केले, नांदेडमधला 'मुळशी पॅटर्न'चा LIVE VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement