advertisement

Ajit Pawat At Yugendra Pawar Wedding: युगेंद्र आज विवाहबंधनात अडकणार, पवार कुटुंबीय एकत्र, पुतण्याच्या लग्नात अजितदादा येणार का? मोठी अपडेट समोर...

Last Updated:

Yugendra Pawar Wedding : बारामतीमध्ये आज सनई चौघाड्यांचे सूर घुमणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आज विवाहबंधनात अडकणार आहेत. मागील काही दिवसांपासून या विवाहानिमित्ताने कार्यक्रम विधी पार पाडले आहेत.

Rapid Read
युगेंद्र आज विवाहबंधनात अडकणार, पवार कुटुंबीय एकत्र, पुतण्याच्या लग्नात अजितदादा येणार का? मोठी अपडेट समोर...
युगेंद्र आज विवाहबंधनात अडकणार, पवार कुटुंबीय एकत्र, पुतण्याच्या लग्नात अजितदादा येणार का? मोठी अपडेट समोर...
पुणे: बारामतीमध्ये आज सनई चौघाड्यांचे सूर घुमणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आज विवाहबंधनात अडकणार आहेत. मागील काही दिवसांपासून या विवाहानिमित्ताने कार्यक्रम विधी पार पाडले आहेत. या निमित्ताने सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. मात्र, पुतण्याच्या लग्नात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पवार घराण्यात आज मोठा सोहळा असूनही राजकीय व्यस्तता आणि कौटुंबिक नातेसंबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद कायम असले, तरी कौटुंबिक कार्यक्रमांत मात्र पवार कुटुंबीय नेहमीप्रमाणे एकत्र दिसत आहेत. आज, ३० नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी विवाहबंधनात अडकत आहेत.
advertisement

अजित पवारांचा प्रचार दौरा...

विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का? हा प्रश्न सकाळपासूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आजच त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठरलेल्या सलग प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. आज रविवारच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या सभांचे नियोजन केले आहे. अजित पवार यांच्याही सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी भोरपासून त्यांचा दौरा सुरू झाला असून दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामती येथे त्यांचे कार्यक्रम आयोजित आहेत.
advertisement

पुतण्याच्या लग्नाला अजितदादा जाणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुतण्याच्या लग्नाला अजित पवार जाणार का, राजकीय फुटीनंतर पवार कुटुंब एकत्र दिसणार का, याची चर्चा सध्या सुरू आहे. युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा आज सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांची त्याच सुमारास बारामतीत प्रचार सभा आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आता बारामतीसह इतर काही नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.  या कारणाने बारामतीमधील सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार हे पुतण्याच्या लग्नात कुटुंबासह उपस्थित राहणार का, याकडे बारामतीकरांसह राज्याचेही लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawat At Yugendra Pawar Wedding: युगेंद्र आज विवाहबंधनात अडकणार, पवार कुटुंबीय एकत्र, पुतण्याच्या लग्नात अजितदादा येणार का? मोठी अपडेट समोर...
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement