Love In Local : सोबत… पण तरीही एकमेकांच्या खूप दूर; एकाच ऑफिसमधील राधिका-साहिलमधील न बोललेलं नातं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
साहिलच्या घरचं आयुष्य मात्र तसं नव्हतं, जसं बाहेर दिसायचं. त्याची बायको अनामिका. सुरुवातीला सर्व ठीक होतं, पण दोन वर्षांपासून नातं तुटलं होतं. अनामिकाचं दुसऱ्या कुणाशीतरी संबंध होते. साहिलनं नातं टिकवायचा प्रयत्न केला, समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. उलट साहिललाच त्रास देऊ लागली. शेवटी थकून साहिलनं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
गाड्यांच्या गर्दीत लोक धावत, गडबडीत आपापल्या ऑफिसच्या दिशेने पळत. त्या गर्दीत दोन चेहरे मात्र एकमेकांशी खूप परिचित झाले होते. राधिका आणि साहिल.
दोघंही मागील पाच वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. राधिकाचं घर पनवेलला तर साहिलचं मानसरोवरला. रोज सकाळी लोकल ट्रेनचा प्रवास, मग ऑफिसचा ताण, आणि संध्याकाळी परत तोच प्रवास. या एकसुरी वाटणाऱ्या दिनचर्येतही त्यांना एकमेकांची सोबत मिळायची.

Ai generated photo
advertisement
“चल, आज तुझ्या फोनमध्ये काय पाहूया? कालचा सिनेमा खूप बोअर होता,” राधिका खोडकरपणे म्हणाली.
“अगं, माझ्या फोनला दोष नको देऊ. तुझाच सिलेक्शन खराब होता,” साहिल हसत म्हणाला.
अशी त्यांची रोजची सुरुवात. प्रवासाच्या गर्दीतही एका फोनमध्ये दोघं डोकं खुपसून बसायचे. विना तारेच्या इअरफोन्सनं देखील त्यांना एकमेकांशी जोडून ठेवलं होतं.
राधिका बिंधास्त मुलगी. मनात आलं ते बोलायची, कोणाची पर्वा करायची नाही. तिचं हसणं, बोलणं सगळ्यांना आवडायचं. दुसरीकडे साहिल अगदी साधा, समजूतदार, मनमिळाऊ मुलगा. कोणाचं मन दुखवेल असं तो कधीच करीत नसे. ऑफिसमध्ये त्याला सगळे आदराने बघायचे.
advertisement
राधिकाला नेहमी वाटायचं “साहिल किती छान आहे! असाच नवरा मिळावा.” पण तिला माहीत होतं, साहिल विवाहित आहे. त्याचं लग्न झालंय. म्हणून तिनं स्वतःच्या मनावर ताबा ठेवला आणि मैत्रीच्या चौकटीतच नातं जपलं.
बाहेरून सगळं छान वाटायचं. ऑफिसमध्येही लोक म्हणायचे “साहिल किती चांगला आहे! बायकोवर किती प्रेम करतो.”

Ai generated photo
advertisement
साहिल हसून दाखवायचा. डब्बा उघडून म्हणायचा, “आज अनामिकानं स्पेशल भाजी केलीये.”
राधिकाच्या मनात नेहमी यायचं, “वा! किती छान नातं आहे यांचं. मलाही असाच नवरा मिळाला तर…”
पण आतून साहिल खचलेला होता. बायकोचं प्रेम त्याला हवं होतं, पण मिळत नव्हतं.
साहिलच्या आयुष्यातलं वादळ

Ai generated photo
advertisement
साहिलच्या घरचं आयुष्य मात्र तसं नव्हतं, जसं बाहेर दिसायचं. त्याची बायको अनामिका. सुरुवातीला सर्व ठीक होतं, पण दोन वर्षांपासून नातं तुटलं होतं. अनामिकाचं दुसऱ्या कुणाशीतरी संबंध होते. साहिलनं नातं टिकवायचा प्रयत्न केला, समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. उलट साहिललाच त्रास देऊ लागली. शेवटी थकून साहिलनं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
advertisement
पण ही गोष्ट त्यानं कधीच कुणाशी शेअर केली नाही. अगदी राधिकाशीही नाही.
अनपेक्षित उलगडा
एके दिवशी ऑफिसमधून साहिलनं सुट्टी मागितली. चार-पाच दिवस बायकोसोबत फिरायला जातोय असं सगळ्यांना सांगितलं. राधिकालाही तसंच सांगितलं.

राधिका साहिलला चिडवत होती, मग आता चार-पाच दिवस तु काही नसणार, माझा आपला एकटीचा प्रवास.. असोत मी माझी पाहिलेली वेब-सिरीज पूर्ण करेन. वैगरे वैगरे....
advertisement
तेवढ्यात साहिल फोनमध्ये वेब-सिरीज सुरु करुन राधिकाच्या हातात एक इअर फोन देतो आणि म्हणतो, "हम्म. बघ बाई तुला काय हवतं बघ, माझी ही तुझ्यापासून थोडे दिवस सुटका होईल आणि ऑफिसपासून पण निवंत वेळ."
पुढे दोघही संभाषण थांबवत नेहमीसारखं फोनमध्ये वेबसिरीज सुरू करुन पाहात असतात.

Ai generated photo
10-15 मिनिट जातात तेवढ्यात साहिलचा फोन वाजतो. साहिल थोडा दचकतो आणि म्हणतो, "अरे अनामिका".
साहिल उठून दरवाज्याजवळ जायला निघतो आणि राधिकाला म्हणतो "मी आलोच" राधिका फक्त मान डोलावते आणि होकार भरते.
साहिल फोन उचलतो. इअरफोन मात्र अजूनही राधिकाच्या कानात होता. त्याला लक्षात आलं नाही, पण राधिकाला मात्र सगळं ऐकू आलं.
“एकदाचा घटस्फोट दे उद्या, मला मोकळं कर!” – अनामिकाचा संतापलेला आवाज.
साहिलनं शांतपणे फक्त, “ठीक आहे,” असं म्हटलं.
फोन संपवून परत येताना साहिलनं खोटं हसत म्हणाला, “ही बायको पण ना, माझ्याशिवाय राहवत नाही. बॅग पॅक करून ठेवलिय म्हणते.”
पण राधिकाच्या डोळ्यात आधीच पाणी आलं होतं. तिनं हळूच कानातला इअरफोन काढून त्याच्या हातात ठेवला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली.
साहिलच्या लक्षात आलं – “आपण फसलोय.”
सत्याचा सामना

Ai generated photo
राधिका बराच वेळ शांत राहिली. तिला वाटलं “हे ऐकायला मला नको होतं. नवरा-बायकोचं बोलणं ऐकणं चुकीचं आहे.” पण शेवटी ती स्वत:ला थांबू शकली नाही.
“साहिल, काय चाललंय तुझ्या आयुष्यात? मला का नाही सांगितलंस? मला वाटायचं तू खूप आनंदी आहेस…”
साहिलनं एक खोल श्वास घेतला. मग सगळं सांगितलं, अनामिकाचं अफेअर, तिची वागणूक, घटस्फोटाचा अर्ज सगळं सगळं....
राधिका ऐकत होती. तिचं मन भरून आलं. “तू खूप साधा आहेस, त्याचाच फायदा तिनं घेतलाय,” ती म्हणाली.
साहिल शांत स्वरात म्हणाला, “माझ्याकडे ती आनंदी नाही. मग मी काय करू शकतो?”
राधिकानं त्याचा हात धरला. “तू खूप स्ट्राँग आहेस साहिल. यातून बाहेर पडशील.” आणि ती शांत झाली. खिडकीतून बाहेर डोकावू लागली... अचानक मनात काहीतरी आलं आणि....
नवं वळण

Ai generated photo
राधिका पटकन काहितरी विचार करत साहिलला म्हणाली, “पण पुढचे चार दिवस काय करणार?”
साहिल म्हणाला, “एकटा सोलो ट्रिपला जाईन. थोडं फ्रेश होऊन येईन बघतो... अजून तसं काही ठरवलं नाही.”
राधिका हसली. “मी आली तर चालेल?”
साहिल थोडा चकित झाला, पण मग म्हणाला, “हो… चल ना. पण तुझी सुट्टी?”
“मी आजारी असल्याचं सांगते. डॉक्टरचं खोटं सर्टिफिकेट देईन ऑफिसला. पण माझ्या मित्राला अशा परिस्थितीत एकटं कसं सोडू? मी फोन करते तुला उद्या. तू बॅग तयार ठेव.” त्या क्षणी साहिलच्या डोळ्यात पहिल्यांदा खरं हसू उमटलं.
नवीन प्रवास

Ai generated photo
दुसऱ्या दिवशी सकाळी साहिल कोर्टात गेला. घटस्फोटाच्या कागदांवर सही केली. नातं संपलं, पण मनात एक पोकळी राहिली.
दुपारी दोघं स्टेशनवर भेटले. राधिकाने सगळं आधीच प्लॅन केलं होतं, मनाली, कसोलची सफर. तिकिटं बुक केली, हॉटेल्स ठरवली. साहिल फक्त तिच्या मागे चालत राहिला.
ट्रेन सुटली आणि दोघांचं नवं प्रवास सुरु झाला. बाहेर डोंगर, धुकं, निसर्गाचं सौंदर्य आणि आत मनातल्या भावनांचा गोंधळ.

Ai generated photo
मनालीच्या थंडीत फिरताना, कॅफेमध्ये बसून कॉफी घेताना, नदीकिनारी चालताना साहिलला जाणवत होतं, “हीच खरी सोबत आहे माझ्यासाठी.” राधिकाही त्याच्यासोबत इतकी नैसर्गिक वाटत होती की तिला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं.
पण त्यांच्या नात्यावर एक सावली कायम होती. साहिल अजूनही घटस्फोटाचा धक्का पचवत होता. राधिकाही स्वतःला आठवण करून देत होती, “हा फक्त माझा मित्र आहे. मला त्याला आधार द्यायचा आहे.”
दोघांच्या डोळ्यात खूप काही होतं, पण शब्द मात्र कमी पडत होते.
त्या सहलीनं दोघांना जवळ आणलं, पण मनातील भावना व्यक्त करण्याइतकी धाडस कुणाकडे नव्हती.
परतीचा प्रवास
काही दिवसांनी ते परत मुंबईला आले. ऑफिसची तीच धावपळ, ट्रेनचा तोच प्रवास पुन्हा सुरु झाला. पण त्यांच्या नजरेत काहीतरी बदललं होतं. ते अजूनही बेस्ट फ्रेंड्स होते. पण आता एकमेकांच्या मनातील वेदना, संघर्ष, आणि अपूर्ण प्रेम त्यांना जाणवत होतं.
शेवट की सुरुवात?

Ai generated photo
राधिका नेहमीप्रमाणे हसत असायची, पण तिच्या डोळ्यांत काळजी दडलेली असायची. साहिल शांत राहायचा, पण राधिकाचं अस्तित्व त्याला नवा आधार देत होतं.
त्यांचा प्रवास अजूनही चालू होता. लोकल ट्रेनमध्ये, ऑफिसच्या गल्लीबोळात, आणि आयुष्याच्या त्या अवघड रस्त्यांवर.
हा प्रवास अपूर्ण होता, कदाचित कधीच पूर्ण होणार नव्हता. पण तरीही या अपूर्ण प्रवासात दोघांनी एकमेकांना शोधलं होतं.
या कथेतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग आणि ठिकाणे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी, जिवंत किंवा मृत, किंवा कोणत्याही सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. जर यात काही साधर्म्य किंवा योगायोग आढळला, तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, समुदाय, धर्म किंवा ठिकाणाला दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/मराठी कथा/
Love In Local : सोबत… पण तरीही एकमेकांच्या खूप दूर; एकाच ऑफिसमधील राधिका-साहिलमधील न बोललेलं नातं