Pahalgam Attack: शिक्षक निघाला गद्दार, पहलगाम हल्ल्यातील मोठा धक्कादायक खुलासा; घरातून उघड झाले कटाचे पुरावे

Last Updated:

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पाच महिने उलटताच जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाला मदत करणाऱ्या 26 वर्षीय शिक्षकाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

News18
News18
जम्मू: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याच्या सहकार्याची ओळख दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद युसुफ कटारिया अशी झाली आहे. २६ वर्षीय युसुफ कटारिया जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षक आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायिक कोठडीत पाठविण्यात आले आहे.
advertisement
ऑपरेशन महादेवमुळे मिळाला धागा
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन महादेवमध्ये ठार केलेल्या लष्कर दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या उपकरणे आणि शस्त्रास्त्रांची तपासणी केल्यानंतर पोलिस मोहम्मद कटारिया पर्यंत पोहोचले. ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले होते.
advertisement
२२ एप्रिलला पहलगाममध्ये २६ जणांची हत्या
उल्लेखनीय म्हणजे २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन दरीत दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. या २६ मृतांपैकी २५ जण पर्यटक होते, जे भारताच्या वेगवेगळ्या भागातून काश्मीरला फिरायला आले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता.
advertisement
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताचा प्रत्युत्तर हल्ला
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांचा नाश केला. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जाते. मात्र पहलगामच्या गुनाहगारांची शोध मोहीम ऑपरेशन महादेवमुळे पूर्ण झाली.
advertisement
जुलैमध्ये हल्लेखोरांचा अंत 
ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी जुलैच्या अखेरीस त्या तीन दहशतवाद्यांचा अंत केला जे २२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. ठार केलेले हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते. हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा उर्फ सुलेमान हा पाकिस्तानातील रावलकोट येथील होता. तर अबू हमजा उर्फ हॅरिस हा पाकिस्तानच्या सियालकोटचा आणि मोहम्मद यासिर हा देखील पाकिस्तानचा रहिवासी होता. आता या घटनेत सहभागी असलेल्या त्यांच्या एका सहयोग्याला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/देश/
Pahalgam Attack: शिक्षक निघाला गद्दार, पहलगाम हल्ल्यातील मोठा धक्कादायक खुलासा; घरातून उघड झाले कटाचे पुरावे
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement