Women Success Story: कॉलेजमधील नोकरी सोडून जोपासला छंद, आता आहे डिजिटल कंपनीची मालक
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Women Success Story: सध्याच्या काळात अनेक गृहिणी देखील व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिकमधील अशीच एक गृहिणी सातासमुद्रापार आपला व्यवसाय घेऊन गेली आहे.
नाशिक: सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी स्वत:च्या क्षमतांना सिद्ध करून दाखवलं आहे. आज आपण पाहिलं तर असं एकही क्षेत्र नाही जिथे महिलांचा सहभाग नाही. सध्याच्या काळात अनेक गृहिणी देखील व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिकमधील अशीच एक गृहिणी सातासमुद्रापार आपला व्यवसाय घेऊन गेली आहे. नाशिक येथील नुपूर मेहता यांनी कॉलेजमधील नोकरी सोडून स्वतःचा 'डिजिटल क्रियेशन'चा व्यवसाय उभा केला आहे.
नुपूर यांना लहानपणापासून क्रियेटिव्ह गोष्टी करण्याची आवड होती. पण, शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स (बी.सी.ए) आणि मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स या दोन पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील एका नामांकित कॉलेजमध्ये नोकरी केली. मात्र, लग्नानंतर मुलाला संभाळण्याची जवाबदारी अंगावर आल्याने त्यांनी आपली नोकरी सोडली.
advertisement
नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या मनात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. व्यवसायासाठी त्यांनी पूर्वीपासून आवड असलेल्या डिजिटल आणि ग्राफिक्स क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. नुपूर यांनी तीन वर्षापूर्वी 'एनीकॅचर बाय नुपूर' या नावाने स्वतःची डिजिटल कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला डिजिटल डिझाईन आणि लग्न पत्रिका तयार केल्या. हळूहळू नाशिकबाहेरूनही त्यांच्या कामाला लोकांची पसंती मिळू लागली.
advertisement
सध्या नुपूर यांच्याकडे संपूर्ण देशभरातून आणि विदेशातूनही ऑडर्स येतात. डिजिटल डिझाईन्स, कंपनी इव्हेंट, डिजिटल गिफ्ट बॉक्स पॅकेजिंग इत्यादींच्या माध्यमातून त्या महिन्याला चांगली कमाई करत आहेत. लग्नसोहळ्यातील अनेक गोष्टी देखील कस्टमाईज करण्याचं काम नुपूर करतात. 'एनीकॅचर बाय नुपुर' या इन्स्टाग्राम पेजला भेट देऊन त्यांच्या कामाबद्दल माहिती घेता येऊ शकते.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Aug 02, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: कॉलेजमधील नोकरी सोडून जोपासला छंद, आता आहे डिजिटल कंपनीची मालक









