महाराष्ट्रातील चुक्याची शेती करणार गाव; शेतकरी करतात लाखोंची कमाई, पाहा Video

Last Updated:

महाराष्ट्रातील या गावामध्ये चुक्याची शेती केली जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होत आहे. 

+
News18

News18

धाराशिव, 20 डिसेंबर: शेती करताना शेतकरी नवनवीन प्रकारच्या पिक पद्धतीचा अवलंब सध्याचा घडीला करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील एका गावात चुक्याची शेती केली जाते. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल परंतु होय हे खरं आहे. धाराशिव जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावात पालेभाजी प्रकारातील चुका या पालेभाजीचे उत्पादन घेतले जाते आणि विशेष म्हणजे पालेभाजीसाठी नाही तर बियाण्यांच्या विक्रीसाठी उत्पादन घेतले जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या गावात चुक्याची शेती केली जाते. पिंपळा खुर्द या गावातील 90 टक्के शेतकरी खरीप हंगामात पावसाळी कांद्याचे उत्पादन घेतात. पावसाळी कांद्यानंतर ते कांद्याच्या शेतात चुका या पिकाची लागवड करतात. पिंपळा खुर्द गावातील शेतकरी बालाजी पाटील यांच्याकडे 7 एक्कर चुक्याची लागवड केलेली आहे. चुक्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात चुका उत्पादन घेतले जाते. चुका या पिकाच्या लागवडीतून चांगलं उत्पादन होत असल्याचेही यावेळी शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.
advertisement
कांद्यानंतर कोसळले पपईचे भाव, हतबल शेतकऱ्यानं बागेवर फिरवला रोटावेटर, Video
एक एकर चुका लागवडीसाठी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो तर चुक्याची लागवड सरी पद्धतीने, इनलाईन ड्रीपच्या सहाय्याने देखील करता येते.  चुक्याचे बी तयार झाले की हैदराबाद येथे विक्री केली जाते. हैदराबाद येथे बियाण्यांना मोठी मागणी आहे. चुक्याला 50 ते 60 रुपयांपासून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतो. चुका लागवडीतून एकरी 50 ते 60 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन होत असल्याचे शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या/कृषी/
महाराष्ट्रातील चुक्याची शेती करणार गाव; शेतकरी करतात लाखोंची कमाई, पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement