आईच्या सल्ल्यानं सुरू केला व्यवसाय, दोघा भावांची महिन्याकाठी लाखोंची कमाई, Video

Last Updated:

आईचा सल्ला मानून सुरू केलेल्या व्यवसायातून धाराशिव जिल्ह्यातील दोघे भाऊ महिन्याकाठी लाखो रुपये मिळवत आहेत.

+
आईच्या

आईच्या सल्ल्यानं सुरू केला व्यवसाय, दोघा भावांची महिन्याकाठी लाखोंची कमाई, Video

धाराशिव, 9 डिसेंबर: कोणत्याही क्षेत्रात सल्ला व मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं ठरतं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं आईनं दोन्ही मुलांना दुधाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. आईचा हाच सल्ला माणून धाराशिव जिल्ह्यातील दोघा भावांनी गोपालन सुरू केलं. आता दुग्ध व्यवसायातून घराशी तालुक्यातील खामगावचे अविनाश व निखिल अंधारे हे भाऊ लाखोंची कमाई करत आहेत.
अलिकडे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून वळले आहेत. खामगाव येथील अंधारे बंधू पारंपरिक शेती करत होते. मात्र, बेभरवशाच्या शेतीमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यातच कोरोनाच्या काळात कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाकिची झाली होती. परंतु, यातून सावरत आई मंगल अंधारे आणि मोठा भाऊ योगेश यांनी दोघा भावांना पशुपालन करण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला माणून शेतीला जोडधंदा म्हणून अंधारे बंधूंनी गोपालन सुरू केलं.
advertisement
दिवसाला लाखोंची कमाई
अंधारे बंधूंनी एचएफ होस्टन जातीच्या नऊ गाई घेतल्या. या गाईंपासून दिवसाला 10 ते 17 लिटरपर्यंत दूळ मिळते. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी मिळून 150 लिटरहून अधिक दूध जाते. यातून महिन्याकाठी 1 लाख 20 हजारांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे गणेश अंधारे सांगतात.
advertisement
जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची केली सोय
अंधारे यांनी जनावरांच्या चाऱ्याची सोय केली. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्रावरती मका, कडवळ त्याचबरोबर सुपर नेपियर 5 जी या गवताची लागवड केली आहे. जनावरांची देखभाल आणि दुधाचा व्यवसाय गणेश आणि निखिल हे करीत असून त्यांना त्यांच्या पत्नी संगीता व निशा या मदत करतात. खरंतर कोरोनाच्या काळात हे कुटुंब डळमळीत झालं होतं. आईच्या सल्ल्याने आणि भावाच्या मार्गदर्शनाने हे कुटुंब वर्षाकाठी लाखो रुपये कमावत आहेत.
advertisement
कुक्कुटपालन, शेळीपालनाची साथ
पशुपालनासोबतच अंधारे कुटुंबीयांनी शेळीपालन आणि कुक्कुटपालनही सुरू केले. उस्मानाबादी शेळ्यांपासून त्यांना वर्षाकाठी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळतेय. तर कोंबड्यांपासून वर्षाकाठी तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, असे मंगल अंधारे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आईच्या सल्ल्यानं सुरू केला व्यवसाय, दोघा भावांची महिन्याकाठी लाखोंची कमाई, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement