शेतकऱ्यांनो, जोडधंदा करण्यासाठी सरकारकडून घ्या क्रेडिट कार्ड! 'या' पद्धतीनं करा अप्लाय

Last Updated:

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात.

+
News18

News18

बीड, 26 ऑगस्ट : शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. शेतकऱ्यांना अधिक कमाई करायची असेल तर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. सर्व सामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा या योजनेचा हेतू आहे.  पशूसंवर्धन विभागाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या पशू किसान क्रेडिट योजना राबवण्यात येते. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
काय आहे योजना?
बीड जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी विजय देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. 'प्रत्येक जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाकडून ही योजना राबवण्यात येते. लघूउद्योगाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या अंतर्गत शेतकरी कर्ज घेऊन जनावरांची खरेदी-विक्री करु शकतात. तसंच आपला पशूपालन व्यवसाय पुढे नेऊ शकतात.
advertisement
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या जवळच्या बँकेत जाणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला एक अर्ज मिळेल जो भरून सबमिट करावा लागेल. यानंतर तुम्हाला केवायसीसाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतील. बँकेशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन हा फॉर्म ऑनलाइन देखील अर्ज करू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमची कागदपत्रे तपासली जातात. जर तुम्ही या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असाल, 15 दिवसात तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळते,' असं देशमुख यांनी सांगितलं.
advertisement
कोणती कागदपत्र हवी?
बँकेत फॉर्म अर्ज करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड सात बाराचा उतारा या कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जनावराचे आरोग्य प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे. तुमची कागदपत्रे तपासल्यानंतर, बँकेकडून 15 दिवसांत कर्ज मंजूर केले जाईल.
advertisement
या कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होते. त्यामधून शेतकऱ्यांना पशूसंवर्धन  ज्याद्वारे शेतकऱ्यांना पशुसंवर्धन करता येऊ शकते. त्यासाठी पशूपालन करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या विकास विस्तार अधिकाऱ्यात संपर्क करु शकता, असे देशमुख यांनी स्पष्ट केलं.
advertisement
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो, जोडधंदा करण्यासाठी सरकारकडून घ्या क्रेडिट कार्ड! 'या' पद्धतीनं करा अप्लाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement