advertisement

विदर्भातील सर्वात मोठ्या बाजार समितीत सोयाबीन आणि कापसाला किती मिळतोय दर? पाहा Video

Last Updated:

विदर्भातील सर्वातमोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि कापसाल किती दर सध्या मिळतोय? पाहा

+
News18

News18

वर्धा, 28 नोव्हेंबर : विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती अशी वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. विदर्भातील इतर बाजार समित्यांपैकी याठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे दर सध्या उच्चांकावर दिसताहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर यलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पादनात घट झालीय. सोयाबीन आणि कापसाचे देखील उत्पादन नेहमीपेक्षा कमीच आहे. आणि भाव देखील शेतकऱ्यांना समाधान कारक नाही. विदर्भातील सर्वातमोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे सोयाबीन आणि कापसाला नेमका किती दर सध्या मिळतोय? यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी माहिती दिली आहे.
काय मिळत आहे दर?
सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या भागात दोन पिकं सर्वात जास्त प्रमाणात येतात. एक म्हणजे कापूस आणि दुसरा म्हणजे सोयाबीन. यावर्षी दोन्ही पिकांची आवक बाजारात अत्यंत कमी आहे. शेतकरी कमी शेतमाल विक्रीकरिता आणू लागले आहेत. त्याचे दोन कारणं आहेत. एक कारण असं की सोयाबीनचे पीक या भागात यावर्षी कमी आहे. येलो मोझॅक रोग आला आणि या रोगामुळे सोयाबीन पीक घटलं. सोयाबीनचे उतारे अत्यंत कमी झाले आहेत. साधारणतः एकरी एक ते दोन क्विंटलचा उतारा बहुतांश शेतकऱ्यांना आला आहे. काही शेतकऱ्यांना थोडेसे ठीक उतारे आले आहेत. या उतारात सोयाबीनचे भाव सुद्धा कमी आहेत, अशी माहिती सुधीर कोठारी यांनी दिली आहे.
advertisement
मोहरीच्या पिकांवर फोफावतोय रोग; चिंता नको, 'असा' करा उपाय!
सध्याच्या भावानुसार, सोयाबीनला 5 हजार 180 पर्यंत जास्तीत जास्त भाव आहे. पीकही कमी आहे आणि भाव देखील कमी आहे. त्याच पद्धतीने कापसाची स्थिती सुद्धा अशी आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकं कमी आहे. आणि भाव सुद्धा कमी आहे यावर्षी साधारणतः भाव 7000 पासून ते 7 हजार 300 रुपयांपर्यंत आहे. 2 वर्षांआधी हेच भाव प्रतिक्विंटल 11 हजार ते साडेतेरा हजारांपर्यंत गेले होते.
advertisement
पण यावर्षी भाव सुद्धा कमी आहे आणि त्या अनुषंगाने स्थिती अशी झाली आहे की उत्पादन कमी भावही कमी. म्हणून शेतकरी बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरिता आणत नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सध्याच्या स्थितीमध्ये बंद आहेत. एकंदरीत पाहता यंदा शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक दृष्ट्या कमजोर आहे जितके पैसे शेतकऱ्यांनी शेती करिता लावले तो उत्पादन खर्च निघणे अवघड झालेलं आहे. म्हणून शासनाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी सुधीर कोठारी यांनी केली आहे.
advertisement
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमालाची आवक कमी आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकाला पाहिजे तो भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी देखील नाराजी व्यक्त करताहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ही व्यक्त केली जाते आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
विदर्भातील सर्वात मोठ्या बाजार समितीत सोयाबीन आणि कापसाला किती मिळतोय दर? पाहा Video
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement