अबब! 3 आलिशान ऑडी कार विकत घेता येतील एवढी रेड्याची किंमत; दररोजचा खर्च पाहून व्हाल चकित

Last Updated:

धाराशिवमध्ये सध्या एका गजेंद्र नव्याच्या रेड्याची चर्चा सुरु आहे. हा रेडा कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.

+
News18

News18

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिवमध्ये सध्या एका गजेंद्र नव्याच्या रेड्याची चर्चा सुरु आहे. हा रेडा धाराशिवमधील पोलीस मुख्यालयच्या मैदानावर सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. दोन टन वजन असलेला या गजेंद्रची किंमत इतकी आहे की त्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तीन आलिशान ऑडी कार विकत घेता येतील. या रेड्याची किंमत दीड कोटी रुपये असून कृषी प्रदर्शनात बघण्यासाठी धाराशिवमधील नागरिक गर्दी करत आहेत.
advertisement
दररोजचा खर्च किती? 
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी या गावचा हा रेडा आहे. या रेड्याचे मालक ज्ञानदेव नाईक आहेत. मुऱ्हा जातीचा असलेला हा रेडा घरच्या म्हशीची पैदास आहे. हिंदकेसरी गजेंद्रला दररोज 15 लिटर दूध, दोन ते तीन किलो सफरचंद, तीन किलो आटा आणि हिरवा चारा आहार म्हणून दिले जातो. या गजेंद्रचा एका दिवसाचा नुसता चाऱ्याचा खर्च हा दोन हजार रुपयांहून अधिक आहे, असं रेड्याचे मालक ज्ञानदेव नाईक यांनी सांगितलं.
advertisement
उच्चशिक्षित तरुणाची कमाल! विदर्भात फुलवली जिरॅनियमची शेती; करतोय लाखोंची कमाई
या रेड्यापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याने त्याचा खर्चही परवडतो. घरी आणखी 50 ते 60 म्हशी आहेत. याला दीड कोटी रुपये बोली लागली. परंतु पैशाचं काय करायचं शेवटी या रेड्याने आम्हाला नाव दिलेय, या रेड्याने आमचे नाव जगभर पसरवले, त्यामुळे हा रेडा आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे दीड कोटी रुपयांचा रेडा आम्ही दावणीला सांभाळतो. बोली लागूनही हा रेडा विक्री केला नसल्याचे ज्ञानदेव नाईक यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
अबब! 3 आलिशान ऑडी कार विकत घेता येतील एवढी रेड्याची किंमत; दररोजचा खर्च पाहून व्हाल चकित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement