सोयाबीन उत्पादकांवर नवं संकट, पानं पडतायंत पिवळी! तातडीनं करा 'हे' उपाय

Last Updated:

विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट कोसळलंय. सोयाबीची पानं पिवळी पडत असून कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिलाय. 

+
सोयाबीन

सोयाबीन उत्पादकांवर नवं संकट, पानं का पडतायंत पिवळी! तातडीनं करा 'हे' उपाय

वर्धा, 9 सप्टेंबर: विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट कोसळलंय. सोयाबीनच्या पिकावर 'यलो मोझॅक' या रोगाने आक्रमण केलंय. सध्या वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पीक फुलधारणा, तसेच शेंग भरण्याच्या स्थितीत आहे. त्यातच उभ्या पिकावर 'यलो मोझॅक'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पीक खराब झाल्याने शेतकरी हतबल झालाय.
ऐन पोळा सणाच्या तोंडावर वर्धा जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झालाय. अनेक ठिकाणी शेतातील सोयाबीन पिकावर फुल धरणीला येत होते. तसेच शेंगा अवस्थेत असताना सोयाबीन पिवळी पडायला लागली आणि बघता बघता जवळजवळ एकर भरातील शेतातील सोयाबीनचे नुकसान झालं. ही परिस्थिती अनेक शेतांमध्ये दिसून येत असल्याचं शेतकरी सांगतात. अशा परिस्थितीत शासनाकडून मदतीची मागणी शेतकरी करत असल्याचं रोशन लांबसोंगे यांनी सांगितलं आहे.
advertisement
काय सांगतात कृषितज्ज्ञ ?
यलो मोझाक या रोगाचे कारण कोणते आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन वाचविण्यासाठी कोणते उपाय करणे महत्वाचे आहे त्याबद्दल वर्धाच्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषीतज्ज्ञ डॉ जीवन कतोरे यांनी मार्गदर्शन केले आहे. पांढऱ्या माशी व किडीमुळे हा रोग पसरला आहे. हळूहळू हा रोग पूर्ण शेत व्यापतो. रोगावर नियंत्रण ठेवायचे असेल तर दिसलेल्या बुरशीवर कृषी मार्गदर्शक आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या औषधांची फवारणी करणं महत्त्वाचं ठरतं, असं कृषीतज्ज्ञ सांगतात.
advertisement
यलो मोझॅकवर उपाय काय?
यलो मोझॅकपासून सोयाबीन वाचवायचं असेल तर आधी पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करावा लागेल. पांढऱ्या माशीला आळा घालण्यासाठी कृषीतज्ज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. कीटकनाशकांचा वापर करावा. हा रोग काही विशिष्ट वाणांच्या सोयाबीनमध्ये आला आहे. त्यामुळे जिथं रोगाची लागण झाली आहे तिथं तात्काळ बुरशीनाशक फवारून घ्यावं, असं कृषीतज्ज्ञ सांगतात.
advertisement
किती हेक्टर सोयाबीन लागवड ?
यावर्षी जिल्ह्यात एकूण 4.05 लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. पण जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात उभ्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना अडचणीत आणलंय. तर यंदा जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 602.70 हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीन पिकावर आलेल्या या रोगामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मात्र कृषी तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार उपाय योजना केल्यास सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा हा येलो मोझॅक रोग शेतकरी नियंत्रणात ठेवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन उत्पादकांवर नवं संकट, पानं पडतायंत पिवळी! तातडीनं करा 'हे' उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement