Video: शेतकरी चिंतेत! कपाशीवरील गुलाबी बोंड अळीवर कसं करायचं नियंत्रण?

Last Updated:

तुमच्याही शेतात कपाशीवर बोंड अळी दिसतेय का? कृषी तज्ज्ञांनी सांगितली नियंत्रणाची प्रक्रिया

+
Video:

Video: शेतकरी चिंतेत! कपाशीवरील गुलाबी बोंड अळीवर कसं करायचं नियंत्रण?

वर्धा, 23 ऑगस्ट: विदर्भात तूर, सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी तर सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा अन् पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडल्याचं दिसतंय. कपाशीवरील या अळीवर कसे नियंत्रण ठेवावे? त्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ? याबाबत वर्धा येथील कृषी तज्ज्ञ डॉ. निलेश वझीरे यांनी माहिती दिली आहे.
काय आहे वर्धा जिल्ह्यातील परिस्थिती ?
यंदा जिल्ह्यात 4 लाख 5 हजार 542.40 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. असे असले तरी सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मध्यंतरी दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्याचा पेरणीचा टक्का 98.44 वर पोहोचला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकरी सुखावला. पिकांनाही नवसंजीवनी मिळाली. असे असले तरी कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, पांढरी माशी आढळल्याचं कृषी तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत पुढे आलं.
advertisement
वर्ध्यात पावसाची दडी
वर्धा जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे. शिवाय जलाशयातीली पाणी पातळीतही आवश्यक वाढ झालेली नाही. त्यातच ऐन पावसाळ्यात पावसाने अनेक दिवस दडी मारल्यामुळे काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यानंतर पाऊस बरसला खरा मात्र पिकांवरील रोगामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत.
advertisement
काय सांगतात कृषी तज्ज्ञ ?
कृषी तज्ज्ञांनी शेतात जाऊन पाहणे केली असता काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीवर बोंड अळी तर सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकांवर कीड लागलेली आहे किंवा रोग आलेला आहे अशा शेतकऱ्यांना व्यवस्थापनाची गरज असल्याचे सांगितले. कपाशीवरील अळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कामगंध सापळे उभारावे आणि निंबोळ्यांचा अर्क काढून त्याची फवारणी करावी. तसेच कृषी मार्गदर्शकांनी सांगितलेल्या कंपन्यांच्या औषधांनी फवारणी करावी, असे डॉ. वझीरे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Video: शेतकरी चिंतेत! कपाशीवरील गुलाबी बोंड अळीवर कसं करायचं नियंत्रण?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement