Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत 10 रुपयांना मिळतो प्रसाद, पण चुरमुऱ्यांची उलाढाल कितीची होते माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीला चुरमुरे, फुटाणे अन् बत्ताशांचा प्रसाद फक्त 10 रुपयांपासून मिळतो. पण, या वारीत प्रसादाच्या उलाढालीचा आकडा खूपच मोठा आहे.
सोलापूर - आषाढी वारीत लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येतात. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन घरी जात असताना वारकरी चुरमुरे, फुटाण्यांचा प्रसाद घेऊन जात असतात. आषाढी वारी आली की महिनाभरापासून चुरमुरे विक्री करणारे व्यापारी तयारी करत असतात. तर या चुरमुऱ्याच्या विक्रीतून आषाढी वारीत 1 कोटीची उलाढाल होत असते. या संदर्भात अधिक माहिती व्यावसायिक रमेश लोखंडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पंढरीत आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीला भाविकांची मांदियाळी असते. या वारीपैकी आषाढी वारी सर्वात मोठी मानली जाते. महाराष्ट्रासह कर्नाटक तसेच इतर राज्यांतून देखील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपुरात येतात. पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत जात असताना पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जात असतात. आषाढी वारी जवळ येत असते तसतसे व्यापारी चुरमुरे मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवतात. आषाढी वारीत मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची वर्षभराची उलाढाल या एका वारीतून होते.
advertisement
आषाढी वारीत 10 रुपयांपासून मिळणाऱ्या चुरमुरे प्रसादाची 1 कोटीची उलाढाल होते. तसेच कुंकू, बुक्का, अष्टगंध, पेढा, मूर्ती, फोटो व अगरबत्ती, साबुदाणा, केळी, अन्य फळांमधून 2 कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच हॉटेल, लहान मुलांच्या खेळणी, संसारोपयोगी साहित्य, टाळ, मृदुंग, वीणा यामधून 30 ते 40 कोटींची उलाढाल या आषाढी वारी कालावधीत होत असते. स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच बाहेर राज्यांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ही अधिक असते.
advertisement
काही दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली असून व्यापाऱ्यांनी देखील जय्यत तयारी केली असून व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वारी कालावधीमध्ये फक्त चुरमुऱ्याच्या प्रसाद विक्रीतूनच एक कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापारी रमेश लोखंडे यांनी दिली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 22, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत 10 रुपयांना मिळतो प्रसाद, पण चुरमुऱ्यांची उलाढाल कितीची होते माहितीये का?