Bank Holiday: शिवजयंतीनिमित्ताने तुमच्या शहरातील बँका बंद राहणार की सुरू? लगेच चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका, सरकारी कार्यालये गुरुवारी बंद, डिजिटल सेवा सुरू राहणार; मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगरमध्ये सुट्टी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या मंगल दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने राज्यातील सर्व बँकांचे कामकाज गुरुवारी बंद राहणार आहे. जर तुमची चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे किंवा प्रत्यक्ष शाखेत जाऊन करायची काही महत्त्वाची कामे शिल्लक असतील, तर तुम्हाला उद्या म्हणजेच शुक्रवारी किंवा शनिवारी सकाळी लवकर ते काम पूर्ण करावं लागणार आहे.
राज्यातील सर्व प्रमुख शहरांत सुट्टी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, शिवजयंतीनिमित्त मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि संभाजीनगरसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बँका पूर्णपणे बंद राहतील. केवळ बँकाच नव्हे, तर सरकारी कार्यालये आणि काही खाजगी संस्थांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, कामाचे नियोजन करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
advertisement
डिजिटल व्यवहार सुरू राहणार
बँकेच्या शाखा जरी बंद असल्या तरी तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही. खालील डिजिटल सेवा २४ तास अखंड सुरू राहतील. पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी सर्व बँकांचे एटीएम नेहमीप्रमाणे सुरू असतील. गुगल पे, फोनपे आणि इंटरनेट बँकिंगद्वारे होणारे व्यवहार अविरत सुरू राहतील. NEFT, RTGS आणि IMPS द्वारे तुम्ही घरबसल्या पैसे पाठवू शकता.
advertisement
इतर राज्यांतील स्थिती काय?
शिवजयंतीची सुट्टी प्रामुख्याने महाराष्ट्रात असते. कर्नाटकातील काही ठराविक सीमावर्ती भागांत या दिवशी सुट्टी असू शकते, मात्र इतर राज्यांमध्ये बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहील. त्यामुळे परराज्यातील व्यवहारांवर याचा परिणाम होणार नाही. सलगच्या सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा भासू शकतो. गुरुवारी बँका बंद असल्या तरी शुक्रवारी, २० फेब्रुवारी रोजी सर्व बँकांचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 6:40 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Bank Holiday: शिवजयंतीनिमित्ताने तुमच्या शहरातील बँका बंद राहणार की सुरू? लगेच चेक करा








