Business Idea: तुम्हाला फायद्याचा बिझनेस करायचाय? मुंबईत 200 रुपयांत मूर्ती खरेदी करा अन् दामदुप्पट नफा कमवा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Business Idea: जर तुम्ही एखादा वेगळा पण विश्वासार्ह व्यवसाय शोधत असाल, तर मूर्ती विक्री हा खूप चांगला पर्याय आहे.
मुंबई : आजकाल कोणताही सण, कार्यक्रम, वाढदिवस किंवा पूजा असली, की लोक देवाची किंवा महापुरुषांची मूर्ती भेट म्हणून देतात. आता आपल्याकडे बहुतांश कार्यक्रमांत आवर्जून मूर्तीच भेट दिली जाते. अशा वेळी तुम्ही एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर मूर्ती विकण्याचा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. मुंबईत दहिसरमध्ये अगदी स्वस्तात आणि होलसेल दरात विविध देवदेवता आणि महापुरुषांच्या मूर्ती मिळतात. तुम्ही येथून खरेदी करून स्वत:चा व्यवसाय सुरू करू शखता. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जर तुम्हाला मूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, आणि तुम्ही स्वस्तात मस्त खिशाला परवडेल असं होलसेल मार्केट शोधत असाल तर दहिसरमधील ‘ओम आर्ट्स’ हे एक योग्य ठिकाण आहे. इथे 50 ते 60 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात. इथे मिळणाऱ्या मूर्ती फक्त गणपतीपुरत्या मर्यादित नाहीत, तर स्वामी समर्थ, रामलला (अयोध्येतील श्रीराम), आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही सुंदर मूर्ती मिळतात.
advertisement
वेगवेगळ्या प्रकारात मूर्ती
1) रंगीत मूर्ती – या मूर्ती पूर्ण रंगवलेल्या असतात, अगदी खऱ्यासारख्या दिसतात.
2)पांढऱ्या मूर्ती – या मूर्ती रंगवलेल्या नसतात, पण खूपच शुद्ध आणि सुंदर दिसतात.
3) रेडियम मूर्ती – या मूर्ती अंधारात चमकतात, त्यामुळे लहान मुलांना आणि गिफ्टसाठी खूप आवडतात.
याठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या मूर्ती POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनवलेल्या नसून, शुद्ध मार्बलपासून बनवलेल्या असतात. त्यामुळे त्या मजबूत आणि टिकाऊ असतात. त्या लवकर तुटत नाहीत, आणि त्यांचं सौंदर्यही दीर्घकाळ टिकतं. ‘ओम आर्ट्स’मध्ये मूर्तींचा दर फक्त 200 रुपयांपासून सुरू होतो. पण होलसेलमुळे इथे किमान 12 मूर्ती खरेदी कराव्या लागतात. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी कमी दरात जास्त मूर्ती खरेदी करून व्यवसाय सुरू करू शकता.
advertisement
मूर्ती व्यवसायाचे फायदे
1) कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू होतो.
2)सणासुदीला मागणी खूप वाढते.
3) धार्मिक भावना जोडल्या जात असल्यामुळे ग्राहक नेहमीच समाधानी राहतात.
4) गिफ्टिंग ट्रेंडमुळे वर्षभर मागणी असते.
जर तुम्ही एखादा वेगळा पण विश्वासार्ह व्यवसाय शोधत असाल, तर मूर्ती विक्री हा खूप चांगला पर्याय आहे. ‘ओम आर्ट्स’कडून मूर्ती घेऊन तुम्ही तुमचं स्वतःचं दुकान सुरू करू शकता, किंवा ऑनलाइन विक्रीही करू शकता. कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा असेल, तर हा व्यवसाय नक्कीच योग्य आहे!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2025 11:47 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Idea: तुम्हाला फायद्याचा बिझनेस करायचाय? मुंबईत 200 रुपयांत मूर्ती खरेदी करा अन् दामदुप्पट नफा कमवा!