Credit Card बिलची थकबाकी सहज भरता येईल EMI मध्ये, लक्षात ठेवा ही महत्त्वाची माहिती

Last Updated:

क्रेडिट कार्डची थकबाकी EMI मध्ये रूपांतरित करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्हाला कमी व्याजदर निवडण्याचा ऑप्शन मिळतो. हे तुमचा CIBIL स्कोअर खराब होण्यापासून देखील वाचवते. तुम्हाला एकाच वेळी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत नाही.

क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड
मुंबई : गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. क्रेडिट कार्ड खरेदीनंतर बिल डिफॉल्ट होण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे लोकांचे CIBIL स्कोअर खराब होताय. अशा घटना टाळण्यासाठी, क्रेडिट कार्ड बॅलन्सचे EMI मध्ये रूपांतर करणे हा एक चांगला ऑप्शन आहे. तुमचे मोठे क्रेडिट कार्ड बिल सुलभ ईएमआयमध्ये कसे रूपांतरित करायचे ते जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड बॅलन्सचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे
1. इंटरनेट बँकिंग
तुमच्या इंटरनेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करा. क्रेडिट कार्ड विभागाअंतर्गत 'कन्व्हर्ट टू ईएमआय' ऑप्शन निवडा. बहुतेक बँका क्रेडिट कार्ड मेंनेजमेंट सेक्शनअंतर्गत ही सुविधा देतात. एकदा निवड झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या थकबाकीवर लागू होणारे वेगवेगळे कालावधीचे ऑप्शन आणि व्याजदर दाखवले जातील. पुढे जाण्यापूर्वी कृपया अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. काही बँका ईएमआयसाठी प्रोसेसिंग फीस आकारू शकतात. एकदा तुम्ही तुमचा EMI ऑप्शन निवडला की, मासिक हप्ते तुमच्या बिलिंग सायकलमध्ये दिसून येतील.
advertisement
2. SMS विनंती
तुमच्या बँकेच्या अधिकृत नंबरवर एसएमएस पाठवा. तुम्हाला बँकेकडून EMIची पुष्टी करण्यासाठी कॉल येईल. अनेक बँका एसएमएसद्वारे EMI मागण्यासाठी पहिलेच ठरलेले स्वरूप प्रदान करतात. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या कार्ड नंबरसह एका विशिष्ट बँकिंग नंबरवर एक विशिष्ट कोड पाठवावा लागेल. तुमची विनंती मिळाल्यावर, उपलब्ध EMI ऑप्शनवर चर्चा करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही त्यांच्यासाठी ही पद्धत सोयीस्कर आहे.
advertisement
3. बँकिंग अ‍ॅप्स
बहुतेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड यूझर्सना बँकिंग अ‍ॅप सुविधा देतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट बिलाची थकबाकी असलेली रक्कम काही सेकंदात सहजपणे EMI मध्ये रूपांतरित करू शकता. तुम्हाला अ‍ॅपवर वेगवेगळे EMI ऑप्शन दिसतील. तुमच्या सोयीनुसार ऑप्शन निवडून तुम्ही थकबाकीची रक्कम EMI मध्ये रूपांतरित करू शकता.
advertisement
4. कस्टमर केअर
तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता आणि तुमचे कार्ड डिटेल्स देऊ शकता आणि ते EMI मध्ये रूपांतरित करण्याची विनंती करू शकता. प्रतिनिधी तुम्हाला उपलब्ध EMI प्लॅन आणि लागू व्याजदरांबद्दल मार्गदर्शन करेल. कॉल करण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती तुमच्याकडे असल्याची खात्री करा. काही बँकांना सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता असू शकते. तुमची EMI रिक्वेस्ट मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश आणि बिलिंग स्टेटमेंट मिळेल. ही पद्धत त्यांच्यासाठी आदर्श आहे ज्यांना थेट बँक प्रतिनिधीशी बोलणे आवडते.
मराठी बातम्या/मनी/
Credit Card बिलची थकबाकी सहज भरता येईल EMI मध्ये, लक्षात ठेवा ही महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement