Donald Trump जिंकले अन् दोस्तालाही केलं मालामाल, elon musk ला असा झाला फायदा!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत.
मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची सरशी झाली. डोनाल्ड ट्रम्प विजयाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट होताच क्रिप्टोकरन्सी बाजारात जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या. बुधवारी डॉगकॉइनचा दर 0.2068 डॉलरपर्यंत पोहोचला. क्रिप्टो समुदायाला ट्रम्प यांचा विजय सकारात्मक वाटत असल्याने या घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. एलॉन मस्क हे डॉगकॉइनचे सर्वांत मोठे समर्थक आहेत. मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हे दोन्ही घटक क्रिप्टो मार्केटसाठी पूरक मानले जात असल्याने डॉगकॉइनमध्ये तेजी पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. बुधवारी डॉगकॉइनची किंमत 0.2068 डॉलरवर पोहोचली. यात 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीला अनुकूल असलेले उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांच्या विजयामुळे क्रिप्टो समुदायाला सकारात्मक संकेत मिळू शकतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टोकरन्सी मार्केटसाठी ट्रम्प यांचा पाठिंबा आणि त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या प्रस्तावामुळे डॉगकॉइनला आणखी चालना मिळू शकते. या प्रस्तावात ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांना या नवीन विभागाचे प्रमुख बनवण्याची योजना आखली आहे. मस्क हे डॉगकॉइनच्या समर्थकांपैकी एक आहेत. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या जगात ते अधिक प्रभावी ठरू शकतात. तसंच मस्क यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने डॉगकॉइनची लोकप्रियता आणखी वाढू शकते.
advertisement
दरम्यान, बुधवारी बिटकॉइनने नवीन उच्चांक केला. तो 75,000 डॉलर्सच्या पलीकडे पोहोचला. बिटकॉइनचा मागचा उच्चांक 73,750 डॉलर्स होता. डॉगकॉइनमध्ये अलीकडे आलेली तेजी आणि क्रिप्टो मार्केटमध्ये त्याचा वाढता प्रभाव यावरून असं दिसतं, की एलॉन मस्क यांचा पाठिंबा आणि ट्रम्प यांचा प्रस्ताव क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकतो. निवडणुकीचा निकाल आणि मस्क यांच्या आगामी योजना लक्षात घेता क्रिप्टोकरन्सी बाजारात येत्या काळात तेजीची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
दरम्यान, कॉइनस्विच मार्केट्स डेस्कच्या माहितीनुसार, डॉगकॉइनला 30 दशलक्ष डॉलर्स शॉर्ट पोझिशन्सच्या लिक्विडेशमुळे मोठी चालना मिळाली आहे. याशिवाय डॉगकॉइन फ्युचरमध्ये ओपन इंटरेस्ट वाढून तो सात अब्जावरून 8.3 अब्ज टोकन्सपर्यंत पोहोचला आहे. यावरून बाजारातली वाढती सक्रियता दिसते.
गेल्या काही महिन्यांपासून डॉगकाइन वेगानं वधारत आहे. मस्क यांची ट्विट्स आणि जाहीर वक्तव्यांमुळे याला पुष्टी मिळत आहे. गेल्या महिनाभरात डॉगकाइनच्या किमतीत 84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत ही वाढ 200 टक्क्यांपर्यंत आहे.
advertisement
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातला एलॉन मस्क यांचा डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट एफिशियन्सीचा प्रस्ताव डॉगकॉइनबद्दलचं बाजाराचं स्वारस्य आणखी वाढवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामुळे मस्क यांचा क्रिप्टो क्षेत्रातला प्रभाव आणखी वाढेल आणि त्यामुळे डॉगकॉइनची किंमत आणखी वधारू शकते. एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा दर्शवला होता, हीदेखील महत्त्वाची बाब आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2024 10:09 PM IST