Crypto Market : शेअर मार्केटवाले कोमात, Bitcoin मात्र जोमात, आली नवी लाट अन् अख्खं मार्केट सुसाट!

Last Updated:

सध्या भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये मात्र तेजी दिसत आहे.

bitcoin
bitcoin
मुंबई: सध्या भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये मात्र तेजी दिसत आहे. बिटकॉइनने आज, सोमवारी (11 नोव्हेंबर) 81,846 डॉलर्सचा नवा सार्वकालीन उच्चांक गाठला. इथेरियम आणि रिपल या क्रिप्टोकरन्सीजदेखील त्याच मार्गावरून चालत आहेत. या दोन्ही क्रिप्टोकरन्सीज त्यांच्या महत्त्वाच्या रेझिस्टन्स पातळ्यांजवळ आल्या असून, या पातळ्यांच्या वर गेल्यास त्या दोन्हींचं मूल्य वाढण्यास आणखी प्रोत्साहन मिळू शकतं, असं 'एफएक्स स्ट्रीट डॉट कॉम'च्या वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यातही 17 टक्के वाढ होऊन ते रविवारी 81,500 डॉलर्सच्या सार्वकालीन उच्चांकापर्यंत गेलं. आता हे वृत्त लिहीत असेपर्यंत त्याने 81,846 डॉलर्सचा नवा उच्चांक गाठला आहे. बिटकॉइनने त्याचा हा वरचा प्रवास सुरूच ठेवला, तर तो 83,062 डॉलर्सला जाऊन त्याच्या फिबोनॅसी एक्स्टेंशन लेव्हलची (161.8 टक्के) पुन्हा चाचणी घेईल. (ही पातळी जुलैचा 70,079 डॉलर्सचा उच्चांक आणि ऑगस्टचा 49,072 डॉलर्सचा नीचांक यांवरून काढली आहे.)
advertisement
रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स 78ला असून, त्याच्या 70 या ओव्हरबॉट लेव्हलच्या वर ट्रेड करत आहे. ट्रेडर्सनी सावध राहण्याची गरज आहे. कारण किंमत कमी होण्याची शक्यता वाढत आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स ओव्हरबॉट क्षेत्रातून बाहेर पडला, तर तो विक्रीचा स्पष्ट संकेत देतो. अन्य शक्यता अशी आहे, की वाढ चालूच राहील आणि रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स ओव्हरबॉट लेव्हलच्या वर राहील.
advertisement
मात्र, बिटकॉइन 78,000 डॉलर्सच्या खाली आला, तर त्याची घसरण आणखी वाढू शकते आणि तो 73,072 डॉलर्सच्या महत्त्वाच्या डेली सपोर्टला रीटेस्ट करू शकतो.
गुरुवारी रिपलची किंमत 0.544 डॉलर्स या दैनंदिन रेझिस्टन्स लेव्हलला आणि 0.548 डॉलर्स या 200 दिवसांच्या एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजला ओलांडून वर आली आणि तीन दिवसांत 6.3 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. सोमवारच्या स्थितीनुसार, ती 0.595 डॉलर्सच्या थोडी वर आहे.
advertisement
रिपलची वाढ अशीच सुरू राहिली, तर 0.626 डॉलर्सच्या डेली रेझिस्टन्सची रीटेस्ट करू शकेल. ही पातळी ओलांडली गेल्यास त्यात आणखी 4 टक्के वाढ होऊ शकेल आणि 31 जुलैच्या 0.657 डॉलर्सच्या उच्चांकाची रीटेस्ट होईल.
रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स 70 असून, तो ओव्हरबॉट लेव्हलच्या आसपास आहे. तो कमी झाल्यास ट्रेडर्सनी सावध राहावं. कारण किंमत कमी होण्याची शक्यता वाढते. 200 दिवसांचं एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेज 0.548 डॉलर्सपेक्षा कमी झालं, तर रिपल आणखी घसरू शकतो आणि 0.488 डॉलर्सच्या पुढच्या महत्त्वाच्या सपोर्टला रीटेस्ट करू शकतो.
advertisement
गुरुवारी इथेरियमची किंमत 2820 डॉलर्सच्या डेली रेझिस्टन्स लेव्हलच्या वर आली आणि रविवारपर्यंत 7.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 3236 डॉलर्सच्या वीकली रेझिस्टन्स पातळीची रीटेस्ट केली गेली. सोमवारी ती 3182 डॉलर्सच्या थोडी वर आहे. इथेरियम 3236 डॉलर्सच्या वीकली रेझिस्टन्स पातळीच्या वर बंद झाला, तर त्यात 9.8 टक्क्यांची वाढ होऊन 3562 डॉलर्सचा 22 जुलैचा उच्चांक गाठला जाऊ शकतो. रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स 75 असून, 70 या ओव्हरबॉट लेव्हलच्या वर ट्रेड करत आहे. वीकली रेझिस्टन्स कायम राहिला, तर इथेरियम 2820 डॉलर्सची पुढची सपोर्ट पातळी रीटेस्ट करील.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Crypto Market : शेअर मार्केटवाले कोमात, Bitcoin मात्र जोमात, आली नवी लाट अन् अख्खं मार्केट सुसाट!
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement